Wednesday, July 3, 2024

अंधेरी कोर्टाकडून शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी अन् आई सुनंदा शेट्टीला समन्स जारी; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईतील अंधेरी न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra), तिची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि आई सुनंदा शेट्टी यांना एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर समन्स बजावले आहे. व्यावसायिकाने २१ लाखांचे कर्ज न भरल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. न्यायालयाने तिघांनाही २८ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अलीकडेच मुंबईतील एका न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सुमारे १५ वर्षे जुन्या अश्लीलतेच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेच्या कृत्याची शिकार शिल्पा झाल्याचे दिसते, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात गेरेने शिल्पाच्या गालाला किस केले होते, त्यानंतर दोघांवर अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (mumbai andheri court issued summon to actress shilpa shetty kundra her sister shamita shetty and mother sunanda shetty)

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या कोर्टाने १८ जानेवारी रोजी शिल्पाची निर्दोष मुक्तता केली होती. या संदर्भातील सविस्तर आदेश सोमवारी उपलब्ध झाला. शिल्पा आणि रिचर्ड यांनी २००७ मध्ये राजस्थानमध्ये एड्सच्या विरोधात जनजागृती कार्यक्रमात भाग घेतला होता. यादरम्यान रिचर्डने स्टेजवर शिल्पाच्या गालाला किस केले होते, त्यामुळे देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता.

शिल्पा आणि रिचर्ड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००७ मध्ये हा खटला राजस्थानच्या कोर्टातून मुंबईत सोपवण्यात आला होता. मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने सांगितले की, आरोपी शिल्पा शेट्टी या खटल्यातील आरोपी क्रमांक एकच्या (रिचर्ड गेरे) कथित कृत्याचा बळी असल्याचे दिसते.

रिचर्डने तिच्या गालावर चुंबन घेतल्यावर शिल्पाने कोणताही विरोध केला नाही, असा आरोप तिच्यावर होता. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, तक्रारीशी संलग्न कोणत्याही मीडिया रिपोर्ट्समध्ये समान हेतू दिसत नाही. यामुळे ती कोणत्याही प्रकारे कट रचणारी किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरत नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर शिल्पा शेट्टी अलीकडेच ‘हंगामा २’मध्ये दिसली होती.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा