Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड मुंबई सत्र न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांची ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई सत्र न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांची ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबईच्या एका सेशन कोर्टाने २० मार्च रोजी जावेद अख्तर यांची एक याचिका फेटाळली आहे. या याचिकेमध्ये जावेद अख्तर यांनी त्यांना मिळालेल्या एका समन विरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली होती. वकील संतोष दुबे यांनी सत्र न्यायालयाने मुलुंड कोर्टाच्या आदेशाविरोधात जावेद अख्तर यांच्या पुनर्निरीक्षण आवेदनाला फेटाळले आहे. आता अख्तर यांना ३१ मार्च च्या आधी मुलुंड कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान वकील संतोष दुबे यांनी स्वतःला आरएसएसचा समर्थक सांगितले आहे. त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर आरोप केला की राजकारणात महत्व मिळवण्याच्या उद्देशाने जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीमध्ये जाणूनबुजून आरएसएसचे नाव घेतले होते. यामुळे आरएसएस बदनाम झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारदार असलेल्या संतोष यांनी मुलाखतीमध्ये आरोप केला आहे की, जावेद अख्तर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी व्यक्तव्य केले होते. सोबतच त्या लोकांचा आत्मविश्वास आणि उत्साह कमी करायचा होता, जे आरएसएसमध्ये सामील झाले आहेत किंवा सामील होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार वकील संतोष दुबेने ऑक्टोबर २०२१ मध्ये आयपीसी कलम ४९९ आणि ५०० च्या अंतर्गत जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही याचिका सबअर्बन मुलुंड मधील मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टात दाखल केली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात समन जरी करण्यात आला होता. दरम्यान याच समन विरोधात गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय

हे देखील वाचा