Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुंबई क्राईम ब्रांचकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, अभिनेत्री अन् मॉडेलचाही…

मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी (२० ऑगस्ट) रोजी एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये मुंबई पोलिसांना सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. यामध्ये एका टीव्ही अभिनेत्री आणि एका मॉडेलचीही येथून सुटका करण्यात आली. तसेच एका टीव्ही अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेला जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

दोन तासांसाठी दोन लाख आकारायचे
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या टीव्ही अभिनेत्रीने तिच्या रॅकेटमध्ये टीव्ही कलाकार आणि मॉडेलचा समावेश केला होता. त्याचवेळी आणखी दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. ही अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत होती. तपास पथकाने ईशा खान नावाच्या महिलेला अटक केली आहे, जी या संपूर्ण प्रकरणाची मुख्य असून ईशा हे सेक्स रॅकेट चालवत आहे.

ग्राहक होऊन केला भांडाफोड
मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यादरम्यान सुटका करण्यात आलेली मॉडेल आणि अभिनेत्रीने एका प्रमुख मनोरंजन वाहिनीसोबत काम केले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राहक बनून या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने या लोकांना सांगितले की, जर माझा मित्र आणि मला टॉप मॉडेल हवे आहेत, तर ईशा खानने अनेक मुलींची छायाचित्रे पाठवली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील दोघांचे फोटो निवडले. त्यापैकी एक टॉप मॉडेल आहे, जिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे, तर दुसरीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

यानंतर जुहूमधील एक पंचतारांकित हॉटेल बुक केले. त्यानंतर गुरुवारी रात्री मॉडेल आणि अभिनेत्रीसह आरोपी ईशा खान त्या हॉटेलच्या बाहेर पोहोचल्या होत्या. त्यांनतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तिला आपल्या ताब्यात घेतले. त्याचबरोबर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून अनेकांना यातून वाचवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

-रितेश अन् नीलमचं ‘मटक मटक के’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

हे देखील वाचा