छोट्या पडद्यावरील अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल पुन्हा एकदा कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. मुंबई पोलिसांनी निशाच्या तक्रारीवर करणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निशाने कौटुंबिक हिंसाचारचा आरोप लावत त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर आता पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी निशाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रार दाखल केली होती की, करण तिला मारहाण करतो. हा गुन्हा शुक्रवारी (२५ जून) दाखल झाला होता. मात्र, असे असले तरीही कोणालाही अटक झाली नाही. (Mumbai Police Case Against Actor Karan Mehra On Wife Nisha Rawal Complaint)
करणच्या कुटुंबाविरुद्धही निशाने केली होती तक्रार दाखल
आपल्या तक्रारीत निशाने करणच्या कुटुंबातील सदस्य, अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांच्यावर आपल्यासोबत अत्याचार करण्याचा आरोप लावला आहे. निशाने सांगितले की, करणने तिच्या बँक अकाऊंटमधून १ कोटींपेक्षाही अधिक रुपये काढले आहेत.
मागील काही काळापासून करण आणि निशाचे मोडलेले लग्न चर्चेत आहे. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडायची. मात्र, जेव्हा निशाने करणविरुद्ध तक्रार दाखल केली, तेव्हा चाहत्यांनाही धक्का बसला. आतापर्यंत या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
मागील महिन्यात म्हणजेच ३१ मे रोजी निशाने करणविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. ती डोक्याला झालेली दुखापतीसह गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. तिने सांगितले होते की, तिचे हे हाल तिच्या पतीने केले आहे. यानंतर करण मेहराला पोलिसांनी अटक केली होती. तरीही, नंतर तो जामीनावर बाहेर आला होता. या सर्व प्रकरणाबाबत करणने म्हटले होते की, निशा आपला भाऊ रोहितसोबत मिळून त्याला फसवत आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने म्हटले होते की, करणने तिच्यावर अनेकवेळा हात उचलला होता. ही त्याच्यासाठी खूपच सामान्य बाब आहे. निशानुसार, करणने तिला अनेकदा बुक्क्या मारल्या आहेत आणि त्याचे व्रणही तिच्या तोंडावर अजूनही तसेच आहेत.
इतक्या काळापासून हे सहन का करत होती? असे विचारल्यावर निशाने सांगितले की, तिचे करणवर प्रेम होते. ती म्हणाली, “मी आजही त्याच्यावर प्रेम करते. मी मूर्ख होते, हे सर्व माझ्या थोबाडीत मारल्यासारखे आहे. कारण मी त्याच्यापासून वेगळे होण्यास तयार नव्हते.”
निशा आपल्यासोबत घडलेली सर्व घटना रडत रडत सांगत होती.
करण मेहराने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ओळखले जाते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक
-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ
-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’










