Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुंबई पोलीसांचे मीम्स तुफान व्हायरल, राधे सिनेमातील एका सीनचा घेतलाय सामजिक संदेश देताना आधार

देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे संपूर्ण जनतेला घरातच बसावे लागत आहे. वैद्यकीय सुविधा पुरवताना जसा डॉक्टरांवर ताण येत आहे तसाच तमाम जनतेला आवरताना पोलिस प्रशासनावर देखील ताण येत आहे. पोलिस नागरिकांना मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा या सूचना वारंवार देऊन देखील आता नागरिक त्यांचे ऐकत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी एका हटक्या अंदाजात नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी ट्विटर अकाऊंटवर सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे’च्या ट्रेलरमधील एक सीन घेऊन त्यावर मीम बनवली आहे. ही मीम शेअर करत पोलिसांनी असे लिहिले आहे की, “कोरोनाला हेच सगळं आवडतं.”

या व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डा कोरोना व्हायरसच्या रुपात दिसत आहे. जो राधे या चित्रपटातील खलनायक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स या व्हिडिओला लाईक करत मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहेत.

सलमान खानचा आगामी ‘राधे’ या चित्रपटाचा ट्रेलर २२ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनंतर ही मीम सर्वत्र व्हायरल झाली आहे. सलमान खानचा हा नवाकोरा चित्रपट १३ मेला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर बघून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, हा चित्रपट नक्की कुठे प्रदर्शित होणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागली होती. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली की , हा चित्रपट जिथे कुठे चित्रपटगृह खुली आहेत तिथे प्रदर्शित केला जाईल तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित केला जाणार आहे. पण हा चित्रपट बघण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारण्यात येणार आहे.

हे देखील वाचा