Wednesday, July 3, 2024

मुंबई पोलिसांकडून शर्लिन चोप्राची ८ तास चौकशी; राज कुंद्रावर लावले होते लैंगिक अत्याचाराचे आरोप

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून १९ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. कुंद्राला प्रथम २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर न्यायालयाने त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अश्र्लील व्हिडिओ बनवून ऍप्सवर अपलोड केल्याबद्दल मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

संपूर्ण पाॅर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहे. राज कुंद्रा हा पाॅर्नोग्राफी रॅकेटचा खरा सूत्रधार असल्याचा दावा पोलीस सतत करत आहेत. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सर्व लोकांची चौकशी केली जात आहे. मुंबई गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्रालाही समन्स बजावले.

पॉर्नोग्राफी प्रकरणी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी शर्लिन चोप्राची कसून चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शर्लिनची पोलिसांनी दुपारी १२ वाजता सुरू केलेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत सुरु होती. शर्लिन म्हणाली, “आज मी मुंबई पोलिसांना भेटायला आले होते, जिथे त्यांनी मला राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित बरेच प्रश्न विचारले.” रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींना मदत करायची असल्याने तिने पोलिसांना बरीच म्हत्वाची माहिती दिली असल्याचे तिने सांगितले.

अभिनेत्री शर्लिनने पोलिसांना सांगितले होते की, “तुम्ही मला हवे तितके प्रश्न विचारू शकता.” पुढे ती म्हणाली, “अभिनेत्री राखी सावंतने चौकशी केल्याशिवाय कोणाबद्दलही काही बोलू नये.”

दरम्यान, शर्लिन चोप्रा जबाब नोंदविण्यासाठी मुंबई पोलिसांकडे आली होती. शर्लिनने राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले होते. शर्लिन म्हणाली होती की, राजने तिला त्याच्या घरी जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला होता. राज कुंद्रा तिला जबरदस्तीने किस घ्यायला सांगत होता. त्यावेळी तिने राजला थांबण्यास सांगितले. कारण, ती खूप घाबरली होती. पण जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा तिने राजला ढकलले आणि वॉशरूमध्ये जाऊन स्वत: ला कोंडून ठेवले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा