टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद काही थांबण्याचे नावच घेत नसून रोज काहीतर नवीन बातम्या यांच्याविषयी येत असतात. अशातच बातमी समोर येत आहे की, उर्फीच्या अडचनी वाढल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कड्यांविरोधात आक्षेप घेतला असून पोलिसात आणि महिला आयोगात तक्रार नोंदवली होती. आता पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतली असून अंगप्रदर्शन करणाऱ्या अर्फीला मुंबई पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपसून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यामध्ये वाद सुरुच आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला असून ती समाजामध्ये न्युडिटी पसरवत आहे असा आरोप केला आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर सतत या दोघी एकमेकींवर टिका करत असतात. यांचा वादामध्ये अनेक राकारण्यांनी आणि सेलिब्रीटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अशातच आता उर्फीचं संकट वाढलेलं दिसत आहे.
उर्फी जावेदला मुंबईच्या जोगेश्वरी याठिकाणी असणाऱ्या अंबोली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असून याठिकाणी तिची चौकशी होणार आहे. या नोटिसनंतर उर्फीला (दि, 14 जानेवारी 2023) रोजी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतली असून उर्फीची चौकशीसाठी पोलिस निरिक्षक शैला कोराडे यांची नियुक्ती केली आहे.
View this post on Instagram
उर्फीला चौकशीसाठी बोलवल्यानंतर आता अनेकांना प्रश्न पडला आहे की उर्फीला अटक करणार का? त्याशिवाय उर्फी चौकशीदरम्यान पोलिसांना किती साहाय्य करेल हे पाहाणे खूप महत्वाचे ठरणार आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसात नाही तर महिला आयोगाकडेही तक्रार नोंदवली होती मात्र, त्यांनी उर्फीविरोधात काही दखल घेतली नाही त्यामुळे महिला आयोग आध्यक्ष रुपाली चाकणकर असही वाद रंगला होता. चाकणकरांनी या प्रकरणात लक्ष घालणार अशी नोटीसही पाठवली होती. त्यामुळे चित्रा वाघ यांनी यांच्यावरही आक्रमक भूमिका साकारली होती. त्या म्हाणल्या होत्या की, ‘अशा 56 नोटिसा मला येतात…’
याचा फायदा उर्फीने दखिल घेतला होता. तिने सोशल मीडिवर ट्वीट शेअर करत चित्राजींना सासू म्हणात चिडवलं होतं. त्याशिवाय उर्फीचे काही ट्वीट आणि व्हिडिओदेखिल चांगलेच चर्चेत आले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर