Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड मुंबई पोलिसांचा ‘कबीर सिंग’ चित्रपटावर ‘डबल अटॅक’, ‘या’ डायलॉगला सांगितलं महिलांविरोधी

मुंबई पोलिसांचा ‘कबीर सिंग’ चित्रपटावर ‘डबल अटॅक’, ‘या’ डायलॉगला सांगितलं महिलांविरोधी

सिनेसृष्टीमध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ‘मुंबई पोलीस’ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन लक्ष ठेवले जाते. चित्रपटांमध्ये तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात, समाजात काय घडत आहे या सर्वांकडे यांचे लक्ष असते.

नुकतेच ‘मुंबई पोलीस’ या इंस्टाग्राम अकाउंटवर काही पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. यावेळी चित्रपटांच्या डायलॉगवर बोट ठेवले गेले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपण वापरलेला प्रत्येक शब्द हा आधी एक विचार असतो. दैनंदिन जीवनात, तसेच चित्रपटात वापरली जाणारी भाषा आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरा!” (Mumbai police shares post on misogynist Bollywood also rised questions on movie’s)

यामध्ये एकूण आठ चित्रपटांच्या डायलॉगवर लक्ष केले आहे. ‘कबीर सिंग’पासून ते ‘उजडा चमन’ पर्यंतच्या काही चित्रपटांची नावे यामध्ये आहेत.

कबीर सिंग
पहिल्या फोटोमध्ये “प्रीती चुन्नी ठीक करो” हा ‘कबीर सिंग’ चित्रपटाचा डायलॉग देण्यात आला आहे. इथे महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा विचार केला जात आहे. प्रत्येक महिलेला कसा पोशाख करावा हे समजते. त्यावर एखाद्या व्यक्तीने बोलणे कितपत गरजेचे आहे. असा संदेश या फोटोमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासह पुढे, “वो मेरी बंदी है” हा डायलॉग देखील देण्यात आला आहे.

हम तुम्हारे है सनम
“तुम एक पत्नी हो, तुम्हारा पती जैसा चाहेगा वेसा ही होगा…ये शादी का दस्तुर है, मर्द औरत का भगवान होता है.” दुसऱ्या फोटोमध्ये हा डायलॉग आहे. साल २००२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हम तुम्हारे है सनम’ यामध्ये शाहरुख खानने हा डायलॉग म्हटला आहे.

मालामाल
साल १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मालामाल’ चित्रपटाचे नाव देखील यामध्ये आहे. या चित्रपटामधील “अगर खूबसूरत लडकी को ना छेडो तो, वो भी तो उसकी बेज्जती ही होती है ना.” हा डायलॉग देण्यात आला आहे.

दिल धडकने दो
साल २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘दिल धडकने दो’ मधील देखील एक डायलॉग घेण्यात आला आहे. “बट आय अलाऊड आयशा टू रन हर बिझनेस.”

दबंग

“प्यार से दे रहे है रख लो, वरना थप्पड मार के भी दे सकते है.” दबंग चित्रपटातील हा डायलॉग देखील इथे देण्यात आला आहे.

चष्मे बहादुर
साल २०१३ मध्ये ‘चष्मे बहादुर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये “व्हेन यू कान्ट चेंज द गर्ल, चेंज द गर्ल” हा डायलॉग देखील एडिट करुन इथे लावण्यात आला आहे.

उजडा चमन
साल २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘उजडा चमन’ हा चित्रपट देखील. मुंबई पोलीसच्या नजरेतून वाचला नाही. यामधील “पुष्पा, हजार बार मैने बोला है कपडे ढंगके पहना कर. तीन तीन मर्द घुम रहे हैं यहॉं” हा डायलॉग देण्यात आला आहे.

मुंबई पोलीस या पेजवरती हे सर्व डायलॉग एडिट करुन टाकण्यात आले आहेत. आपल्या समाजामध्ये या सर्व गोष्टींचा चुकीचा परिणाम होतो. आपण जे वागत असतो तेच चित्रपटांमध्ये दाखवले जाते. अनेक वेळा चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देखील काही व्यक्ती वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समाजाचा दृष्टीकोन बदलावा म्हणून या पेज वर अशा पद्धतीने हे डायलॉग एडिट करून टाकण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा