Tuesday, July 9, 2024

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात बॉम्ब फोडण्याची धमकी; तपासात झाला ‘हा’ खुलासा

मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तींने फोन करुन धमकी दिल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील तीन प्रमुख रेल्वे स्टेशन आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब फोडण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास प्रक्रीया सुरु केली.

बॉम्ब फोडण्याच्या धमकीमुळे पोलिसांनी या सर्व ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ केली आहे. मात्र, शोधमोहीमेत आतापर्यंत संशयास्पद काहीही सापडले नाही. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस सातत्याने करत आहेत. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीचा फोन आला.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर रेल्वे स्टेशन आणि जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवला आहे, असे सांगण्यात आले आहे. फोन आल्यानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे संरक्षण दल, बॉम्ब शोधपथक आणि स्थानिक पोलीस कर्मचारी तात्काळ या ठिकाणी पोहोचले. तसेच शोधमोहीम सुरु केली.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी कोणत्याही ठिकाणी आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतु तेथील सर्व ठिकाणी पोलीसांनी कडक बंदोबस्त केला आहे. त्याचवेळी, माहितीचे गांभीर्य पाहून ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्याच क्रमांकावर पोलिसांनी ताबडतोब संपर्क साधला. मात्र, तो फोन केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने पोलिसांनाच सुनावले आहे. “मला त्रास देऊ नका आणि फोन डिस्कनेक्ट करा.” त्यानंतर त्या व्यक्तीशी कोणताही संपर्क झालेला नाही. संशयिताने फोन बंद करून ठेवला आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी फोन करणाऱ्यांना शोधले असुन दोन व्यक्तींना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी प्रकाश जाधव म्हणाले की, त्यांनी आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे राजू कांगणे आणि रमेश सिरसाठ अशी सांगितली जात आहेत. हे दोघेही मुंबई लगतच्या कल्याणचे रहिवासी आहेत. त्यांनी दारूच्या नशेत फोन केला असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा