Saturday, October 18, 2025
Home अन्य Bail | हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर, धारावीतील विद्यार्थी आंदोलनप्रकरणी झाली होती अटक

Bail | हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर, धारावीतील विद्यार्थी आंदोलनप्रकरणी झाली होती अटक

सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर विकास फाटक उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) याला गुरुवारी (१७ फेब्रुवारी) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. धारावीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी ​​हिंदुस्थानी याला अटक करण्यात आली होती. धारावी पोलिसांनी त्याला १ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

जानेवारीच्या अखेरीस धारावी आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दहावी आणि बारावीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑफलाइन परीक्षेला विरोध करत त्यांनी रस्त्यावरच गोंधळ घातला होता. ​​हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावले, असा आरोप करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलन करत काही वाहनांची तोडफोडही केली. (mumbai sessions court grants bail to vikas fhatak alias hindustani bhau)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ म्हणाला की, “या दोन वर्षांत कोव्हिडमुळे अनेकांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत, कुटुंबे या धक्क्यातून सावरत आहेत आणि आता ओमिक्रॉनचे नवीन नाटक सुरू झाले आहे. हे काय आहे? सरकार लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा का घ्यावी? परीक्षा रद्द करा, असे हिंदुस्थानी भाऊ यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला. मुलांच्या जीवाशी खेळू नका, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल. परीक्षा रद्द करा.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धारावी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. हा व्हिडिओ २४ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता. अटकेच्या वेळी हिंदुस्थानी भाऊचे त्याला २.७७ लाख व्ह्यूज मिळाले होते. विकासचे यूट्यूब चॅनलवर ५ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

हेही वाचा :

हेही पाहा- 

हे देखील वाचा