Wednesday, July 3, 2024

अश्लीलता पसरवल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी पोहोचली कोर्टात, ‘या’ व्यक्तीने केले होते सार्वजनिक ठिकाणी किस

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (shilpa shetty kundra) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी शिल्पा शेट्टी तिच्यावर सुरू असलेल्या एका कायदेशीर खटल्यामुळे चर्चेत आहे. हे प्रकरण २००७ सालचे आहे जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने एका कार्यक्रमात शिल्पाला तिच्या परवानगीशिवाय सार्वजनिकपणे किस केले होते. याप्रकरणी त्याच्यावर अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टी कोर्टात पोहोचली असून ती फेटाळण्याची मागणी केली आहे.

शिल्पा शेट्टीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “शिल्पा शेट्टी कुंद्रा ही मूळ तक्रारदाराच्या हातून दुर्भावनापूर्ण कारवाई आणि छळाची बळी आहे. प्रतिवादी एक प्रस्थापित कलाकार आहे आणि तिने तिच्या सार्वजनिक जीवनात आणि खाजगी जीवनात नेहमीच जबाबदारीने वागले आहे. ”

यावर्षी जानेवारी महिन्यात दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात शिल्पा शेट्टीची निर्दोष मुक्तता केली होती. आपल्या निकालात, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने शेट्टीला २००७ मध्ये राजस्थानमधील अलवर येथे दाखल केलेल्या फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१७ मध्ये हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्यात आले होते. जानेवारीमध्ये न्यायदंडाधिकारी म्हणाले की, सध्याची आरोपी शिल्पा शेट्टी यांच्यावरील आरोप निराधार असल्याबद्दल मी समाधानी आहे. आता अलवर पोलिसांनी या प्रकरणी शिल्पाला दोषमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले आहे.

शिल्पा शेट्टीने २००७ मध्ये राजस्थानमध्ये एड्स जनजागृती कार्यक्रमात भाग घेतला होता. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (जेएमएफसी), मुंडवार यांच्या न्यायालयात अश्लीलता आणि गुन्हेगारी कट रचल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘प्रिय शमशेरा…’, चित्रपट फ्लॉप होताच करण मल्होत्राची ‘ती’ भावूक पोस्ट व्हायरल

सर्वाधिक पोलिसांची भूमिका निभावून जगदीश राज खुराना यांनी केला होता रेकॉर्ड, वाचा त्यांची कहाणी

अरे देवा! भारती सिंगने पोराला चक्क केले जोकर, चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

 

हे देखील वाचा