टीव्हीवरील मालिकांच्या दुनियेत आजवर अनेक सुपरहिट मालिका होऊन गेल्या. घरातील वृद्ध व्यक्ती चित्रपटांपेक्षा मालिका जास्त पाहतात. दररोज पुढे काय घडणार, मालिकेला कोणते वेगळे वळण मिळणार याकडेच त्यांचे लक्ष असते. मालिकांवरून घराघरांमध्ये तासंतास चर्चा देखील रंगताना दिसतात. अशात कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या विषयांवरील मालिका आपण पाहत असतो. या सर्व मालिका फार फार तर २ वर्षे टीव्हीवर चालतात. अशात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने टीव्हीवरील सर्वच मालिकांचे विक्रम मोडले आहेत. साल २००८ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हा पासून आता पर्यंत जवजवळ १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
ही एक अशी मालिका आहे जी घरातील सर्वच सदस्य एकत्र बसून पाहू शकतात. वेगवेगळे विषय हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने मालिकेतून दाखवले जातात आणि त्यातून समाजप्रबोधन देखील केले जाते. त्यामुळे गेली १३ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे. मालिकेमध्ये असलेले सर्वच रसिकांच्या घरातील सदस्य बनले आहेत. अशात सध्या या मालिकेमधील टप्पू आणि बबिताजीची भूमिका साकारणारे कलाकार एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या जोरावर आहेत. बबिताजीची भूमिका मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका राज अनादकट साकारत आहे. जेठालाल आपल्या पत्नीवर म्हणजेच दया भाभीवर खूप प्रेम करतो परंतु बबिताजीला खुश ठेवण्याची एकही संधी सोडत नाही असे या मालिकेत दाखवले जाते. यामुळे टप्पू, बबिताजी या दोघांवरून सोशल मीडियावर जेठालालवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. यातील काही मजेशीर मिम्स पाहुयात.
Jethalal to Tapu???? pic.twitter.com/oBFvoIePA2
— Gungun⁷ || inactive (@D_n_A_BTS_) September 9, 2021
या मिम्समध्ये टप्पू म्हणतोय की “मी वडिलांच्या नजरेतून आधीच उतरलो आहे”. आता अजून किती उतरणार.
Meanwhile tapu on first date with babita jii: pic.twitter.com/Kg1tCzYMmS
— Varsha saandilyae (@saandilyae) September 9, 2021
तर दुसऱ्यामध्ये अजय देवगणचा फोटो आहे आणि त्यावर ‘हमें तो आपनोंने लूट लिया, गैरो मैं कहा दम था’ हा डायलॉग लिहिलेला आहे.
यावर जेठालाल पण असंच म्हणत असणार असा मिम्स बनवला आहे. त्यानंतर पुढचा मिम्स पाहून, तर तुम्ही पोट दुःखे पर्यंत हसाल. यामध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील एक फोटो आणि ‘साप को पाल रहा था’ हा डायलॉग देण्यात आला आहे.
Jethalal to tapu pic.twitter.com/1iLpliz9zq
— kamaal ka ladka???? (@male_bitch666) September 9, 2021
तसेच पुढे ‘हो सकता है उन्हे हमसे रिश्ता नहीं रखणा हैं … कोई बात नाही. हमारी तरफसे से भी कोई जबरदस्ती नहीं हैं’ असा डायलॉग लिहला आहे. यामध्ये जेठालालच दुःख कधी कमी का नाही होत असं लिहून मिम्स बनवला आहे.
Jethalal to tapu pic.twitter.com/1iLpliz9zq
— kamaal ka ladka???? (@male_bitch666) September 9, 2021
या नंतर टायगर श्रॉफच्या फोटोवर ‘जो सिखा हैं आपिसें सिखा हैं’ हा डायलॉग आहे आणि यावर खाली जो सिखा हैं आपिसें सिखा हैं, टप्पूने ते करून दाखवलं जे त्याचे वडील १३ वर्ष नाही करू शकले. असे लिहून हा मजेशीर मिम्स बनवला आहे.
Younger sibling after complaining about the elder sibling to their Parents#TMKOC #MEMES #humour pic.twitter.com/MphIbUochm
— Abhisek Nayak (@abhisshn) August 13, 2021
‘पाप नहीं गुन्हा किया है तुमाने’, ‘आजसे टप्पू की पॉकेटमनी बंद’ असे अनेक मजेशीर मिम्स बनवण्यात आले आहेत.
Jethalal after seeing the news of Tapu and Babita's relationship…. pic.twitter.com/wQHOKPHDZM
— Shreyansh⁷ ♡✨ (@anshxchaos) September 9, 2021
Future Scenes From Jethalal House..????????????????#Jethalal #TMKOC pic.twitter.com/tSOJzNlcX1
— Jethalal (@Jethiya_lal) September 9, 2021
#TMKOC #jethalal #tapu #Babitaji #iyer #Bapuji #champak #TaarakMehtakaooltahChashmah#MunmunDutta#RajAnadkat#DilipJoshi
????????????????????
Meanwhile Jethalal after Babita & Tapu Relationship : pic.twitter.com/RrApHtfgnn— Anirudhha Sankhe (@Ani_Sankhe) September 9, 2021
काही दिवसांपूर्वीच मुनमुनने या शोमध्ये पुरागमन केले. मुनमुन आणि राज हे दोघे अनेकवेळा डिनर डेटवर सोबत जाताना दिसतात. तसेच हे दोघेही एकमेकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्षवेधी कमेंट करत असतात. या दोघांमध्ये मैत्री पलीकडचे संबंध आहेत. तसेच मुनमुन परत आल्यापासून ते दोघे सेटवर बराच वेळ एकत्र घालवतात. ‘तारक मेहता का उल्टा चश्माचा’ या मालिकेतील सर्व कलाकारांना यांच्या नात्याबद्दल माहिती आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’
-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी