सिनेसृष्टीमध्ये तसेच मालिकांमध्ये कलाकारांच्या दाखवल्या जाणाऱ्या जोडप्यांचे अनेक चाहते असतात. अनेकांना त्यांनी आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये देखील असेच एकत्र असावे असे वाटते. यामध्ये काही विनोदी मालिकांमधील कलाकारांच्या प्रेमाविषयी काही समजले, तर विनोदासाठी अनेक नेटकरी त्यांच्यावर मिम्स बनवतात. अशात सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दोन कलाकारांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या मालिकेतील टप्पू आणि बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांचे प्रेम प्रकरण सुरु असल्याचे, अनेक वृत्त समोर आली आहेत. हे दोघे गेले अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
अनेकांनी, तर असेही वृत्त छापले आहे की या दोघांचे प्रेम प्रकरण मालिकेतील सर्व कलाकारांना माहित आहे. सेटवर हे दोघे भरपूर वेळ एकमेकांबरोबर घालवतात. राज हा मुनमुन पेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मालिकेमध्ये जेठालालची जान असलेल्या बबिताजीचे सोशल मीडियावर ५० लाखांहून अधिक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. सध्या तिच्या खासगी आयुष्यातील सुरु असलेल्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. अद्याप तिने आणि राजने दोघांमधील संबंधांविषयी काहीच माहिती दिली नसल्याने, सर्व जण संभ्रमात आहेत. तसेच या दोघांच्या वक्तव्याची वाट पाहत आहेत. (Munmun Dutta has been in discussion about marriage with this actor before raj anadkat know who that person)
मुनमुनचे या आधी देखील एका अभिनेत्यासोबत नाव जोडले गेले होते. अभिनेता विनय जैनसोबत ती लग्न करणार, असे अनेक वृत्त समोर आले होते. अभिनेता ‘स्वाभिमान’, ‘आंधी’, ‘इश्क सुभान अल्ला’, ‘देख तमाशा देख’ अशा मालिकांमध्ये झळकला आहे. सध्या मुनमुन आणि राजला अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाते. याअगोदर ती विनयसोबत अनेक ठिकाणी डेट करताना दिसली होती. त्यामुळे अनेकांनी तिच्या विषयी तेव्हा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या. परंतु नंतर अभिनेत्रीने स्वतः याविषयी माहिती देत, ती अद्याप सिंगल असल्याचे सांगितले होते. सध्या राजविषयी सुरू असलेल्या वृत्तावर तिने मौन बाळगले आहे. तसेच राजनेही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास
-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’