Saturday, July 6, 2024

‘फिटनेस फ्रिक’ मलायकाने ‘या’ कारणामुळे सुरू केली होती मॉडेलिंग, तर पुढे तेच बनले तिचे करिअर; स्वत: केला खुलासा

अभिनेता अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय होती. मलायकाने अनेक जाहिराती केल्या आणि अनेक प्रोडक्ट्ससाठी मॉडेलिंग ही केले. तिने गेली अनेक वर्षे मॉडेलिंग क्षेत्रात काम केले आहे. याच संदर्भात मलायका अरोरा म्हणाली की, झटपट पैसे कमवण्यासाठी तिने मॉडेलिंग सुरू केले होते. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटात आईटम साँग्ज केले आहेत. जी मोठ्या प्रमाणात गाजली देखील होती.

मलायका अरोराने मॉडेलिंगवर आधारित शोची परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा मॉडेलिंगशी संबंधित शो परीक्षण करण्याविषयी बोलली आहे. मलाईका म्हणाली की, “यावेळी शोमध्ये अनेक चांगल्या मुली आल्या आहेत. अनेक मुली जे लहान आणि मागासलेल्या राज्यांतून आल्या आहेत, त्यांनाही ही संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष सहभागी होऊन ऑडिशन देण्यात अडचण येते, पण ते व्हर्चुइल पद्धत असल्याने हे खूप सोपे झाले आहे.” (Munni of Bollywood gave this advice to all the young women who are modeling, she said)

मॉडेलिंगचे दिवस आठवत मलायका म्हणाली की, “लहान वयात मॉडेलिंग करणं माझासाठी खूप कठीण होतं. माझासाठी हे सर्वात बरंच आव्हानात्मक होतं. मी कोणत्याही अपेक्षेशिवाय या क्षेत्रात उतरले होते. मला वाटले की, पैसे कमवण्याच्या दृष्टीने ही एक उत्तम संधी आहे. मला माहित नव्हते की, शेवटी हेच माझे एक करिअर बनेल.” मलायका अरोरा एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय ती अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड देखील आहे. अर्जुन कपूरसोबत अफेअर होण्याआधी ती सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. मात्र, नंतर तिने अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना एक मुलगा देखील आहे.

याशिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा