अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिची स्टाईल कोणालाही तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी आहे. सध्या ती चित्रपट जगतात फारशी सक्रिय नसली, तरी सोशल मीडियावर अनेकदा तिचा जलवा पाहायला मिळतो. मल्लिका शेरावत रोज तिचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत राहते. नुकतेच तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना पुरता वेड लावत आहे.
अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात ती एखाद्या शॉर्ट ड्रेस किंवा बिकिनीमध्ये नाही, तर साडीमध्ये दिसली आहे. होय, मल्लिकाने तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नेहमीप्रमाणे बरीच सुंदर दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर स्लिव्हलेस ब्लाउज अभिनेत्रीच्या या साडी लूकला हॉटनेसचा तडका लावत आहे. (murder girl mallika sherawat shared her saree look)
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “साडी लव्ह” असं लिहिलं आहे. या फोटोला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही काळातच या फोटोला २७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ नाही, तर या आधीही तिने अनेकदा आपल्या साडी लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिला २००४ साली आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटासाठी ओळखलं जातं. यातील तिचा बोल्ड अंदाज पाहून सर्वचजण चकित झाले होते. यानंतर मल्लिका अनेक चित्रपटांत झळकली आहे. यामध्ये ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘डरना जरुरी है’, ‘शादी से पेहले’, ‘आपका सुरूर’, ‘वेलकम’, ‘हिस्स’, ‘डबल धमाल’ या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत
-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा