मराठी संगीतक्षेत्रातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार यांचे रविवारी (३१ ऑक्टोबर २०२१) रोजी राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. सकाळी ८ वाजता त्यांची निधन झाले आहे.
व्हायोलिनमधील त्यांचा हातखंड खूप मोठा आहे. त्यांच्या व्हायोलिनमधून निघणारा प्रत्येक स्वर थेट प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन भिडत असे. त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून मागील सहा दशक काम केले आहे. त्यांनी मराठी तसेच हिंदी संगीतक्षेत्रात देखील त्यांचे योगदान दिले आहे. (Music director and violian prabhakar jog’s death at age of 89)
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाड्यामधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत.
बाबुजींबरोबर प्रभाकर जोग यांनी गीता रामायणाच्या जवळपास ५०० कार्यक्रमांना साथ दिली आहे. तसेच त्यांनी ‘येडा की खुळा’, ‘अंतरपाट’, ‘धाकटी सून’, ‘ढगाला लागली कळ’, ‘चांदणे शिंपीत जाई’, ‘देवघर’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.
त्यांच्या मृत्युच्या बातमीने संगीत क्षेत्रातील सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.
ज्येष्ठ सुप्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक श्री . प्रभाकर जोग यांचे आज दिनांक ३१.१०.२०२१ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरी पुण्यात दुःखद निधन झाले ????
— Neelima Kulkarni (@starneelima) October 31, 2021
नीलिमा कुलकर्णी यांनी ट्वीट करून सगळ्यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “ज्येष्ठ सुप्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक श्री . प्रभाकर जोग यांचे आज दिनांक ३१.१०.२०२१ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरी पुण्यात दुःखद निधन झाले.”
१९९९ चा फोटो.
गजाननराव वाटवे , संगीतकार रामभाऊ फाटक,एक नवोदित संगीतकार , बाबूजी , प्रभाकर जोग साहेब आणि एक रसिक.@abpmajhatv @News18lokmat @mataonline @zee24taasnews @eSakalUpdate @LoksattaLive @MarathiBrain @MarathiRT @ColorsMarathi @aparanjape pic.twitter.com/OAtqgywhys— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) July 26, 2018
त्यांनी केलेल्या या पोस्टवर संगीत क्षेत्रातील अनेकजण तसेच त्यांचे चाहते कमेंट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘क्वीन’ म्हणत सलमान खानने उडवली खिल्ली; संतापलेल्या शमिताचे प्रत्युत्तर, भाईजाननेही घेतली शाळा
-स्वतःवरच राहिला नव्हता विश्वास, ‘या’ व्यक्तीच्या निधनाने पूर्णपणे तुटला होता अर्जुन बिजलानी; वाचा