Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर संगीतकार होण्याचे नव्हे, तर ‘हे’ होते अनु मलिक यांचे खरे स्वप्न, जाणून घेऊया त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी

संगीतकार होण्याचे नव्हे, तर ‘हे’ होते अनु मलिक यांचे खरे स्वप्न, जाणून घेऊया त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी संगीतसृष्टीला अनेक नवनवीन गाणी दिली आहेत. त्यांचे वडील सरदार मलिक हे देखील एक नामांकित संगीतकार होते. मंगळवारी (2 नोव्हेंबर) रोजी ते त्यांचा वाढदिवस साजरा करत असते. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.

अनु मलिक यांचा जन्म 2 नोव्हेंबर1960रोजी मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव बिलकीस मलिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. आज एक प्रसिद्ध संगीतकार असलेल्या अनु मलिक यांना संगीतकार बनण्याची इच्छा नव्हती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना एक पोलिस अधिकारी बनायचे होते. त्यांनी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी देखील केली होती. परंतु त्यांच्या नशिबात संगीतकार होणे लिहिले होते. (Music director Anu Malik celebrate his birthday, let’s know about his career)

अनु मलिक यांनी 1977 मध्ये ‘हंटरवाली 77’ या चित्रपटातून त्यांच्या संगीत करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी ‘पूनम’ आणि ‘आपस में बात’ या चित्रपटांना संगीत दिले.1982 मध्ये ‘मंगल पांडे’ या चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर 1984साली आलेल्या ‘सोहनी महिवाल’ या चित्रपटातील गाण्यांनी त्यांना खरी ओळख दिली.

अनु मलिक यांच्या करिअरमध्ये 1993 मध्ये मोठे वळण आले. या वर्षी महेश भट्ट यांचे ‘फिर तेरी कहाणी याद आई’ आणि ‘सर ‘हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले होते. या नंतर त्यांना खरी ओळख मिळाली. ‘बाजिगर’ चित्रपटानंतर तर त्यांचे नाव भारतातील कानाकोपऱ्यात पसरू लागले. या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी हिट झाली होती. यासाठी त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला होता.

‘बाजिगर’ या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरनी चांगलीच धाव घेतली. त्यांनी ‘बॉर्डर’, ‘रिफ्युजी’, ‘एओसी कारगिल’, ‘अक्स’, ‘फिजा’ आणि ‘मैं हू ना’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. त्यांनी जसजसे यश मिळत गेले. तसतसे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले जाऊ लागले. त्यांच्यावर संगीत चोरल्याचा आरोप लावला गेला होता. तसेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा देखील आरोप लावला होता.

त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत दोन वेळा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार स्वीकारला आहे. तसेच ‘रिफ्यूजी’ या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी ‘इंडियन आयडल’ या शोचे परीक्षण देखील केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
शाहरुख खानच्या आधी ‘या’सुपरस्टारला ‘डर’ चित्रपटात ‘राहुल मेहरा’ची भूमिका केली होती ऑफर
आज 6000 कोटींचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या कुटुंबाला एकेकाळी दोन वेळची भाकरी मिळणे होते कठीण!

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा