Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, परिस्थितीने शाळा ही सोडावी लागली, पाहा ए. आर रहमान यांचा प्रेरणादायी प्रवास

लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, परिस्थितीने शाळा ही सोडावी लागली, पाहा ए. आर रहमान यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान, ज्यांनी अकादमी पुरस्कारांसह अनेक मोठे पुरस्कार आपल्या उत्कृष्ट संगीताद्वारे जिंकले आहेत, त्यांची जगभरात ओळख आहे. आज ए.आर. रहमानकडे सर्व काही आहे ज्याची त्याने कधीही इच्छा केली असेल. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना पैशांअभावी अभ्यास अर्धवट सोडावा लागला. ए.आर. रहमान हिंदी संगीत जगतातील आघाडीचे गायक म्हणून ओळखले जातात. आपल्या जादूई आवाजाने त्यांनी संगीत जगताला नवीन ओळख दिली आहे. मात्र त्यांचा संघर्षमय प्रवास पाहाल तर तुम्हीही थक्क व्हाल. 

ए आर रहमानचे वडील देखील संगीतकार होते, मात्र रहमान नऊ वर्षांचा असताना वडिलांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या निधनानंतर रहमानला खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाला मदत करायला सुरुवात केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. यानंतर रहमान 15 वर्षांचा झाला तेव्हा कमी उपस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागली. ए आर रहमान यांना वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. यासोबतच त्यांना स्वतः संगीताची आवड होती. स्वत:च्या कलेला त्यांनी आपली ताकद बनवली.

आज याच छंदामुळे ए.आर.रहमान जगभर फिरत असतात. एआर रहमान यांनी पहिल्यांदा रोजा हा चित्रपट आपल्या संगीताने चांगलाच गाजवला. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.  त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. रहमान यांनी दिल से, रंग दे बसंती, लगान, झुबेदा आणि जोधा अकबर या चित्रपटाच्या उत्कृष्ट संगीताने अनेक चित्रपटांना सुपरहीट केले आहे. त्यांच्या जय हो गाण्याला ऑस्करनेही पुरस्कार दिला होता. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. (music director ar rahman life struggle and trivia)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंग आत्म’हत्ये प्रकरणी हनी सिंगच माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अभिनेत्याचा मृत्यू…’

रोमियो-ज्युलिएटमध्ये, दिग्दर्शकाने फसवणूक करून मिळवले नग्न दृश्य, कलाकारांनी गुन्हा दाखल करत केली करोडोंची मागणी

हे देखील वाचा