Friday, July 5, 2024

दुःखद! मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध संगीतकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. टॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय संगीतकार जोडी असलेल्या राज-कोटी यांच्यामधील राज यांचे २१ मे रोजी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले आहे. राज यांचे खरे नाव थोटकुरा सोमराजू होते. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांना अटॅक आला तेव्हा ते बाथरूममध्ये होते, तिथेच ते घसरून पडले. राज हे प्रसिद्ध तेलगू संगीतकार टीव्ही यांचे यांचा मुलगा होते. राज यांनी संगीतकार कोटी यांच्यासोबत टीम बनवत त्यांनी टॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना हिट संगीत दिले होते.

मनोरंजनविश्वातील जगप्रसिद्ध संगीतकार असलेल्या ए आर रहमान यांनी त्यांच्या हाताखाली राहून टॉलिवूडमध्ये अनेक वर्ष कीबोर्ड वाजवला आणि प्रोग्रामर म्हणून काम केले. तोताकुरा सोमाराजू यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण टॉलिवूडमध्ये शोक पसरला आहे. राज यांनी कोटी यांच्यासोबत मिळून १८० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. या जोडीने टॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत. त्यांचे बहुतकरून गाणी एसपी बालासुब्रमण्यम आणि चित्रा यांनीच गायली आहेत. याशिवाय त्यांनी काही गाणी लिहिली आणि गायली देखील आहेत. १९९४ साली राज आणि कोटी या जोडीला ‘हॅल्लो ब्रदर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ‘नंदी पुरस्कारा’ने गौरवण्यात आले होते.

राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टी दुःखात असून अनेक लहान मोठ्या कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

हे देखील वाचा