Tuesday, July 9, 2024

‘आश्रम’पूर्वी रिलीझ झालेली एमएक्स प्लेअरवरील ‘ही’ वेबसीरिज एकट्यातच पाहा, नुसता बोल्डनेसचा कहर

सध्याच्या काळात बॉक्स ऑफिस मागे पडताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस लोकप्रियता मिळवत आहे. सिनेमांना सेन्सॉर बोर्डामुळे बोल्ड आणि वल्गर कंटेंट दाखवता येत नाही. मात्र, ओटीटीवर सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे याचा कंटेंटवर काहीही परिणाम होत नाही. ओटीटीसारखा कंटेंट हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत नाही. अशीच एक वेबसीरिज आहे जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही वेबसीरिज दुसरी-तिसरी कोणती नसून ‘हॅलो मिनी’ आहे. तसं पाहिलं तर बॉबी देओल याच्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजनेही सर्वांच्या उत्सुकता ताणल्या होत्या. मात्र, ‘हॅलो मिनी’ यापेक्षाही वेगळी आहे.

सन २०२१ मध्ये प्रदर्शित झालेली ‘हॅलो मिनी ३’ (Hello Mini) या वेबसीरिजमधील बोल्ड सीन्सनी हद्द पार केली आहे. यामध्ये अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन्सचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

आयएमडीबीकडून मिळाली जबरदस्त रेटिंग
‘हॅलो मिनी’ ही वेबसीरिज प्रदर्शनानंतरपासूनच ट्रेंडिंग होणाऱ्या वेबसीरिजच्या यादीत सामील झाली आहे. सध्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसीरिजमध्ये ‘हॅलो मिनी’चाही समावेश आहे. प्रेक्षकांकडून या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच आयएमडीबी (Internet Movie Database) या वेबसाईटकडूनही या वेबसीरिजला चांगली रेटिंग मिळाली आहे. आयएमडीबीने या वेबसाईटने ‘हॅलो मिनी’ वेबसीरिजला १० पैकी ८.२ रेटिंग दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anuja Joshi (@anujabomajoshi)

रोमँटिक-थ्रिलरचा खजिना आहे ‘हॅलो मिनी’ वेबसीरिजचा
‘हॅलो मिनी’ ही एक रोमँटिक आणि थ्रिलरचा खजिना असलेली वेबसीरिज आहे. ही वेबसीरिज एका तरुण मुलीची कहाणी आहे. नोवोलेन चक्रवर्ती आणि क्रोक्टेल्स यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित या वेबसीरिजचे दिग्दर्शन फारुक कबीर (Faruk Kabir) यांनी केले आहे. एक मुलगी कोलकाताहून मुंबईला येते. त्यानंतर तिला समजते की, कुणीतरी आपला पाठलाग करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले, तरीही त्या मुलीला नंतर समजते की, तो खरं तर तिची मदत करत असतो.

‘हॅलो मिनी’चे तिन्ही सिझन एमएक्स प्लेअरवर उपलब्ध
‘हॅलो मिनी’ या वेबसीरिजचे तिन्ही सिझन एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या वेबसीरिजला २०२०मध्ये ई४एम प्ले अवॉर्ड्समध्ये सर्वोत्तम थ्रिलर आणि हॉरर वेबसीरिजचा पुरस्कारही मिळाला आहे. या वेबसीरिजमधील कास्टबद्दल बोलायचं झालं, तर अनुजा जोशी, प्रिया बॅनर्जी, मृणाल दत्त, अंशुल पांडे, गौरव चोप्रा, दर्शना बनिक, निकिता चोप्रा आणि अर्जुन अनेजा यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

‘तू इतकी सेक्सी का आहेस?’, अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या फोटोंवरील चाहत्याची कमेंट वेधतेय लक्ष

काली माताच्या हातात दिसला LGBTQचा झेंडा अन् सिगारेट, #ArrestLeenaManimekalai होतंय ट्विटरवर ट्रेंड

हे देखील वाचा