नुकतीच बदलापूर येथून एक अमानवी घटना समोर आली आहे. यामध्ये दोन शाळकरी मुलींवर त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केले आहे. या घटनेचा समाजावर अतिशय नकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. या विरोधात अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शन केले आहे. बदलापूर रेल्वे स्थानाकार अनेक नागरिकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शन केले.
सोशल मिडिया सुद्ध अशाच प्रकारच्या पोस्ट्स ने भारल आहे. अनेक कलाकारांनी यावर मत मांडले असून घटनेचा तीव्र विरोध केलेला त्यातून पाहायला मिळत आहे. अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी वर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रिया म्हणते, माझं रक्त खवळत आहे. हे व्यवसायाशी नसून मुलींच्या सुरक्षिततेविषयी आहे. या पोस्ट मध्ये तिने या घटनेविषयी लिहिले आहे आणि तिचा संताप व्यक्त केला आहे. इतरही अनेक मराठी अभिनेत्यांनी याबाबत अशाच पोस्त करून सोशल मिडीयावर नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे.
प्रिया व्यतिरिक्त अभिजित केळकर, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुरेखा कुडची, रसिका सुनील आदि कलाकारांनी अशाच पोस्ट केल्या आहेत. याबाबत आता शासनाकडून काय कारवाई केली जाते हे बघण्याजोगे असेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
जान्हवीच्या पाठींब्यात धावून आला पती; पोस्ट करून मांडली बाजू, सोशल मिडीयावर चर्चा…