Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

छोटी परीही रमली विठ्ठल भक्तीत! क्यूट व्हिडिओ शेअर करत म्हणतेय, ‘सुखी ठेव मित्रांना’

रविवारी (१० जुलै) संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत रंगून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कलाकारांनी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. यात बालकलाकार मायरा वैकुळचाही समावेश आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक गोड व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओत ती तुळशीला पाणी घालून विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीसमोर हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. तिने यावेळी तिच्या सर्व मित्रांना सुखी ठेवण्याचे साकडे देखील विठूरायाकडे घातले आहे. मायरा या व्हिडिओमध्ये पारंपारिक वेशात गोड दिसत आहे.

‘मायरा माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत असेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा