Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नागिन फेम अभिनेत्रीने शेअर केले घायाळ करणारे हॉट फोटोज!

‘नागिन’ फेम अभिनेत्री सुरभी चंदना ज्या दिवशी आपल्या सुंदर फोटोज शेअर करते त्या दिवशी ती चर्चेत राहते. एकता कपूरच्या नागीन ५ या मालिकेमध्ये ती बानीची भूमिका साकारत आहे. सुरभी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि तिची सुंदर छायाचित्रे शेअर करत असते. आता सुरभीचं लेटेस्ट बोल्ड फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या साडीमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये सुरभी चंदना पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. यासह तिने स्टाईलिश पिवळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. तिने गळ्याभोवती अनोखा हार घातला आहे आणि खुल्या केसांनी आपला लूक पूर्ण केला आहे. ती कॅमेर्‍याकडे पाहताना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सुरभी चंदनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला बोहो व्हाइब्स येत आहेत विचारू नका का’ या फोटोंवर चाहत्यांनी त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सुरभी चंदनाच्या या फोटोंवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने लिहिलंय की, ‘दहशत वाढवत आहे, तू.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिलंय की, ‘ज्या पोस्टची मी सर्वात जास्त प्रतीक्षा करत होतो ती येथे आहे.’ आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘बानी साडीचा नवा ट्रेंड सेट करत आहे’. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘ही नागिन आपल्याला ठार मारेल.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘हाय गर्मी, कुणी तरी एसी लावा यार.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्ही साडीमध्ये सुंदर दिसत आहात की साडी तुमच्यावर!’ हे समजतच नाही.

यापूर्वी सुरभी चंदनाने माध्यमांशी नागीन शोचा भाग असल्याबाबतच्या विशेष संभाषणात म्हटले होते, ‘खरे सांगायचे तर मी सुरुवातीला तयार नव्हते. मला कॉल आला की नागीनचे कास्टिंग चालू आहे. मी त्यांना सांगितले की मी तयार आहे असे मला वाटत नाही. मला वाटलं संजीवनीनंतर मी ओटीटीवर काहीतरी करेन. वेब सीरिजसाठी उर्वरित लोकांशी बोलणी सुरू होती, परंतु कदाचित नागिन माझ्या नशिबातच असेल. काही दिवसांनंतर मला नागिनच्या टीमचा फोन आला की यावेळी संकल्पना वेगळी आहे, कथा देखील वेगळी असेल. आपण भूमिकेसाठी योग्य आहात.

विशेष म्हणजे ‘इश्कबाज’ या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री, सुरभी चंदना टीव्ही जगाचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. सुरभीने कॉलेजच्या काळापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने सब टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उलटा चश्मापासून सुरुवात केली. या शोमध्ये तिला एक छोटीशी भूमिका मिळाली. पण या शोचे निर्माते तिला रिप्लेस करणार होते कारण तिला त्या ओळी आठवत नव्हत्या. याचा खुलासा स्वतः अभिनेत्री सुरभी चंदना हिने केला आहे.

हे देखील वाचा