‘नागिन’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत या मालिकेचे ५ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून, चाहत्यांना ‘नागिन’च्या सहाव्या सीझनची प्रतीक्षा लागली आहे. अशातच, ‘नागिन ६’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नागीणची धमाकेदार एंट्री दाखवली जात आहे. मात्र यावेळी एकता कपूरची (Ekta Kapoor) नागीण थोडी वेगळी कथा घेऊन येणार आहे. प्रत्येक वेळी आपला जुना बदला घेण्याच्या विचारात असलेली नागीण, यावेळी आपल्या देशाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
वेगळ्या कन्सेप्टसह परतली नागीण!
व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “विषला फक्त विषच मारू शकते. यावेळी स्वतःसाठी नाही, तर देशाच्या रक्षणासाठी नागीण बदलली आहे.” कलर्सच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शन देण्यात आले आहे, “देशाच्या रक्षणासाठी, विष बनून विषाचा नायनाट करण्यासाठी पुन्हा एकदा येत आहे नागीण.”
Desh ki raksha karne ke liye, zeher bann kar zeher ko hi khatam karne aa rahi hai Naagin, phir ek baar!”
#Naagin6, jald hi #Colors par. @justvoot pic.twitter.com/XI8UyIQcHv— ColorsTV (@ColorsTV) January 18, 2022
निया शर्मा की रुबीना दिलैक, कोण असणार नागीण?
‘नागिन’ शोचा हा टीझर पाहून चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. सोशल मीडियावर कमेंट करत चाहते म्हणत आहेत, “उत्तम संकल्पना.” तर कुणी म्हटलं, “वाह काय डोकं लावलंय.” तर कोणी म्हणाले, “आता चीनचं काही खरं नाही.” या व्यतिरिक्त चाहतेही वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावेळची नागीण कोण असणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी रुबीना दिलैक (Rubina Dilaik) एकताच्या ‘नागिन’ शोमध्ये एन्ट्री मारू शकते.
या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाहीये की, यावेळी कोणती टीव्ही स्टार या शोमध्ये नागीणच्या भूमिकेत दिसणार आहे. निया शर्माबद्दल (Nia Sharma) बरेच लोक म्हणत आहेत की, यावेळीही ती नागीणच्या अवतारात दिसणार आहे. मात्र, तरीही ‘नागिन ६’ मध्ये कोणती टीव्ही अभिनेत्री नागीणचे रूप धारण करणार, हे पाहणे फारच रंजक ठरणार आहे.
हेही वाचा :