अस कोण करतंय व्हय..! चक्क बॉम्ब फोडून ‘नागीन’ फेम अनिताने केले आपल्या बाळाचे स्वागत


‘ये है मोहब्बते’ या स्टार प्लसवरील प्रसिद्ध कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली शगुण अर्थातच अनिता हसनंदानी ९ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता आणि रोहित दोघे क्युट कपल आहेत, यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच हे आई बाबा झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रोहितने ही बातमी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेयर केली होती.

प्रेग्नेंसीदरमन्यान अनिता आपल्या बेबी बम्पचे फोटो सोशल मीडियावर शेयर करायची. मुलाच्या जन्मानंतर देखील अनिताच्या मुलाची पहिली झलक समोर आली होती, ज्यात अनिता आणि तिचा पती आपल्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला घेऊन फारच उत्साही होते. त्यांच्या या फोटोला लोकांनी खुपच पसंत केले होते. अनिताच्या चाहत्यांसोबतच तिचा मित्रपरिवार, स्टार्स मंडळी यांनी देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

अनिताने आपल्या लहान मुलगा आणि रोहित समवेत एक खुपच क्युट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. लाखांच्या घरात या व्हिडिओला व्युज मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर तो व्हायरल देखील झाला, ज्यात अनिताने एका फिल्टरच्या साहाय्याने दाखविले की आपल्या मुलाचा जन्म कसा झाला. त्या व्हिडीओमध्ये अनिताच्या पोटावर बॉम्ब दिसत आहे, ज्याला रोहित आग लावतो आणि जेव्हा हा बॉम्ब फुटतो तेव्हा ते दोनाचे तीन होतात. हा व्हिडीओ खूपच सुंदर असून चाहते या व्हिडीओला खूपच पसंत करत आहेत.

रोहित आणि अनिता यांच्या लग्नानंतर जवळपास आठ वर्षानंतर हे दोघे आई- बाबा झाले होते. त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला होता. अनिताच्या बाळाच्या जन्मानंतर त्याचा फोटो शेयर करण्यात आला होता. ज्यात बाळाची एक झलक स्क्रीनवर पाहायला मिळाली होती. प्रेग्नेंसीच्या काळात ती सोशल मीडियावर फार सक्रिय होती. त्यावेळी तिने केलेले फोटोशूट देखील फार चर्चेत राहिले होते. डिलिव्हरीनंतरचे फोटो देखील फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.

अनिताने टेलिव्हिजनवर आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने हिंदी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटात देखील काम केले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील काव्यांजली आणि ये है मोहबत्ते या मालिकांनी तिला विशेष ओळख करून दिली. सोबतच कभी सौतन , कभी सहेली यात देखील ती दिसली होती. शेवटी ती नागीण या कार्यक्रमात झळकली होती. नागीण ३ व ४ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती आणि आपला पती रोहित सोबत तिने नच बलीये सिजन ९ मध्ये सुद्धा सहभाग नोंदविला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.