कलाकारांसोबत आर्थिक फ्रॉड होणे हे आता खूपच सामान्य झाले आहे. अनेक कलाकार या फ्रॉडचा सामना करताना दिसतात. अशा फ्रॉडच्या माध्यमातून कलाकरांना देखील लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकीय नेत्या नगमा यांना देखील लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये गायब झाले आहे.
अभिनेत्री नगमा यांना २८ फेब्रुवारी रोजी मोबाइलवर एक मेसेज आला की आज रात्री त्यांच्या नेट बँकिंगला ब्लॉक करण्यात येणार आहे. असे नको असल्यास पॅन कार्ड नंबर अपडेट करा. यानंतर नगमा यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केले. नंतर त्यांच्याकडे ओटीपी मागितला गेला. नगमा यांनी जसा ओटीपी टाकला तसे त्यांच्या बँकेतून 99,998 रुपये काढून घेतले गेले. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 420,419, 66c आणि 66D च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला करत तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान ही तक्रार दाखल केल्यानंतर मागील दोन आठवड्यांमध्ये अशा अनेक केसेस समोर आल्याचे देखील समजले. मुंबई सायबर सेलने अशा ७० पेक्षा अधिक एफआयआर नोंदवून घेतल्याचे लक्षात आले.. मात्र अजून या प्रकरणात कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. ३०० पेक्षा अधिक सिम कार्डच्या मध्यमातून असे फ्रॉड केल्याचे समजत आहे. सध्या त्यांना ओळखण्याचे काम चालू आहे.
पोलिसांनी सांगितले की ५००० पेक्षा अधिक सिम कार्डचा वापर करून असे फ्रॉड केले जाते. हे एक पूर्ण प्लॅनिंग करून मग केलेला गुन्हा आहे. याला एक गॅंग अंमलात आणण्याचे काम करते. आपल्यला अशा मेसेजपासून सावध राहणे खूपच आवश्यक आहे. दरम्यान पोलीस आता यावर तापस करत असून याआधी बोनी कपूर यांना देखील अशाच फ्रॉडचा सामना करावा लागला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच
मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री










