Tuesday, July 9, 2024

अश्लील नृत्य आणि गीत प्रकरण | गायक हनी सिंगच्या अडचणीत वाढ, नागपूर कोर्टाने दिले ‘हे’ आदेश | Honey Singh

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका न्यायालयाने गायक हनी सिंगने अश्लील गाणे गाऊन इंटरनेटवर पोस्ट केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात हनी सिंगला न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. याप्रकरणी हनी सिंगला स्थानिक पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आणि त्याच्या आवाजाचा नमुना देण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली यांनी २७ जानेवारी रोजी गायकाला ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान नागपुरातील पाचपाओली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गायकावर परदेशी प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. न्यायालयाने हनी सिंगला २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान दुबईला जाण्याची आणि ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हनी सिंगने (honey singh) परदेश प्रवासासाठी घालण्यात आलेली अर्जातील अट शिथिल करण्याची मागणी केली होती. या संदर्भात न्यायालयाने हनी सिंगला २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान दुबईला जाण्याची परवानगी दिली आणि ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. हनी सिंगच्या अर्जाला विरोध करताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, गायक २५ जानेवारीला पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार होता. परंतु तो हजर होऊ शकला नाही आणि त्याने असे करण्यास असमर्थता ईमेलद्वारे कळवली.

गायक हनी सिंगने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत. ज्यामध्ये ‘ब्ल्यू आईज’, ‘हाय हिल्स’, ‘पार्टी अभी बाकी है’ अशी जबरदस्त हिट गाणी दिली आहेत. त्याच्या या गाण्यांमुळे त्याच्याबद्दल तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. आपल्या गाण्यातील आवाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या हनी सिंगने त्याच्या करिअरची सुरुवात युट्यूबवरून केली होती

हेही वाचा :

हे देखील वाचा