Thursday, June 12, 2025
Home भोजपूरी Viral Video: नम्रता मल्लाच्या डान्सने लावली सोशल मीडियावर आग, बोल्डनेसचा जलवा पाहून नेटकरी झाले घायाळ

Viral Video: नम्रता मल्लाच्या डान्सने लावली सोशल मीडियावर आग, बोल्डनेसचा जलवा पाहून नेटकरी झाले घायाळ

भोजपूरी डान्सर नम्रता मल्ला (Namrata Malla) आपल्या तडफदार डान्ससाठी आणि घायाळ करणाऱ्या अदांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिच्या घायाळ करणाऱ्या अदांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या नम्रताला बॉलिवूडच्या गाण्यांचे चांगलेच वेड लागलेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेत्री कॅटरिना कैफच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर आता पुन्हा एकदा नम्रताने राणी मुखर्जी आणि अनिल कपूर यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स पाहिल्यानंतर चाहत्यांचीही झोप उडाली आहे. केशरी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केलेल्या नम्रता मल्लाने तिच्या केसात गजरा घालून दमदार नृत्य सादर केले. कपाळावरचा पांढरा ठिपका तिला आणखीनच सुंदर बनवत आहे. नम्रताची सुंदर फिगर दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नम्रता मल्ला ही भोजपुरी सिने जगतातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बोल्ड फोटोंनी आणि अदांनी ती नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते. सध्या नम्रताचा अशाच एका व्हिडिओने सर्वांना वेड लावले आहे.
हा व्हिडिओ शेअर करत नम्रता मल्लाने इंटरनेटचे तापमान चांगलेच वाढवले ​​आहे. अवघ्या 1 तासात या व्हिडिओला हजारो व्ह्यूज पाहिले जात आहेत. यासोबतच चाहते हा व्हिडिओ शेअर करून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत. कमेंट करताना नेटकरी तिच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत तर कोणी तिच्या डान्सचे खूप कौतुक केले आहे.

नम्रता मल्लाने सोशल मीडियावर पहिल्यापासूनच खळबळ माजवली आहे. इंस्टाग्रामवर तिची चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंस्टाग्रामवर नम्रताचे1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचा कोणताही व्हिडिओ पाहिला की तो एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीसारखाच सोशल मीडियावर व्हायरल होतो. नम्रताने अल्पावधीतच खूप नाव कमावले आहे. नम्रता एक अप्रतिम नृत्यांगना आहे तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभावही जबरदस्त आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा