दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे महेश बाबू. महेश फक्त साऊथ चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याची लोकप्रियता संपूर्ण भारतात, किंबहुना संपूर्ण जगात त्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या अभिनयाने त्याची ओळख साऊथपुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण जगात त्याने त्याच्या प्रतिभेने ओळख निर्माण केली. महेश बाबू ९ ऑगस्टला त्याचा वाढदिवस साजरा करतो. साऊथ इंडस्ट्रीमध्ये महेश बाबू हे नाव सिनेमा सुपरहिट होण्यासाठी पुरेसे आहे. महेश बाबू म्हणजे चित्रपट सुपरहिट हे ठरलेले असते. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जगातून त्याला शुभेच्छा आल्या. मात्र यासर्वांमध्ये अनोख्या आणि लक्षवेधी शुभेच्छा ठरल्या त्या, त्याच्या पत्नीने नम्रता शिरोडकरने दिलेल्या शुभेच्छा.
नम्रताने महेश बाबुसोबत तिचा एक रोमँटिक आणि क्यूट फोटो पोस्ट करत लिहिले, “ती व्यक्ती जी माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आहे, माझे तेव्हा, आज आणि कायमस्वरूपी! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा एमबी. तू जेवढे समजू शकतो, त्यापेक्षा अधिक तुझ्यावर प्रेम करते महेश बाबू.” यासोबत तिने शेअर केलेला फोटो तुफान व्हायरल होत आहे. नम्रताच्या या अनोख्या शुभेच्छा सोशल मीडियावर खूपच चर्चेत राहिल्या. (Namrata shirodkar wish to mahesh babu romantic post)
‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘वामसी’ हा साऊथ सिनेमा साइन केला. या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी महेश तिला पाहून तिच्या प्रेमात पडला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान महेशने तिला त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. जसे शूटिंग पुढे सरकत होते, तसे तसे त्यांचे प्रेमही बहरू लागले.
महेश आणि नम्रता यांच्या प्रेमाबद्दल फक्त महेशच्या बहिणीला माहित होते. मीडियापासून हे लपवण्यासाठीच घरात कोणालाही त्यांच्या नात्याविषयी समजू दिली नव्हते. या दोघांनी एकमेकांना जवळपास चार वर्ष डेट केले. चार वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नम्रतासोबत महेशने १० फेब्रुवारी २००५ मध्ये त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले. आज दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुले झाली.
या दोघांच्या मुलांचे काही व्हिडिओ नम्रता बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करत असते. आज महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल
-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित