Monday, August 11, 2025
Home साऊथ सिनेमा साऊथमध्ये बिनसलं! YCP सरकारवर भडकले कलाकार, नागार्जुन यांनी थेट नंदामुरींनाच विचारला प्रश्न

साऊथमध्ये बिनसलं! YCP सरकारवर भडकले कलाकार, नागार्जुन यांनी थेट नंदामुरींनाच विचारला प्रश्न

सध्या सगळीकडेच साऊथ सुपरस्टार्सचा बोलबाला होताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये आणि त्यांच्या निर्भीड वक्तव्यामुळे नेहमीच हे कलाकार चर्चेचा विषय बनत असतात. पुन्हा एकदा साऊथमधील असेच तीन कलाकार आहेत, ज्यांनी युवजन श्रमिक रायथू कांग्रेस सरकारला फटकार लावली आहे. त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे हे तीनही कलाकार खूपच चिडले आहेत. चला तर जाणून घेऊया की, नेमके कोण आहेत हे कलाकार आणि कोणत्या निर्णयामुळे चिडले आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये युवजन श्रमिक रायथू कांग्रेस (Yuvajana Sramika Rythu Congress Party) सरकारने असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लोकांसोबत काही सेलिब्रिटी देखील सरकार विरोधात टीका करत आहेत. आंध्रप्रदेश सरकारने ‘डॉ एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेज युनिव्हर्सिटी’चे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हा अभिनेता दोन दिवसांपूर्वीच नंदामुरी कुटुंबात सामील झाला असून या राजकीय खेळाला सामोरे जाण्यासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘आरआरआर’ फेम अभिनेत्याने एक ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “या निर्णयामुळे ना वायईएसआरचा मान वाढणार आहे आणि ना एनटीआरचा मान कमी होणार आहे.” यासोबतच अभिनेते नंदामुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) यांनीही सरकारचा निषेध करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे नाराज झाले बालकृष्ण
आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे अभिनेते बालकृष्ण हे खूपच नाराज आहेत. आंध्र सरकारने अचानकच ‘डॉ एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायंसेज युनिव्हर्सिटी’ हे नाव बदलून ‘वाईएसआर’ असे ठेवणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला ज्युनिअर एनटीआरसोबतच अभिनेते बालकृष्ण हेदेखील खूपच नाराज दिसत आहेत. त्यांनीही आपल्या तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत असताना सांगितले की, “एनटीआर हे फक्त माणूसच नाही, तर ते तेलुगू संस्कृती आणि सभ्यतेचे व्यक्तिमत्त्व आहेत. तेलुगू लोकांचे ‘वेल्लु मुक्का’ (Vennu Mukka) आहेत. त्यांनी पुढे चेतावणी देत सांगितले की, लोकांना वायईएस हे सरकार बदलायचे आहे. आजही (वायएसआरसीपी) या पक्षातले काही लोक एनटीआर यांच्या तुकड्यांवर जगत आहेत.”

बलय्या यांनी दिला YSR निर्णयाचा उल्लेख
बालकृष्ण हे खूपच दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले असून ते एक राजकारणी आहेत. त्यांनी 2000 दशकाच्याा माध्यामात राजीव गाधी यांच्या ‘शमशाबाद अंतरराष्ट्रीय हवाई उड्डान’ (Shamshabad International Airport) हे नाव बदलून वायईएसआरचा उल्लेख करत म्हणाले की, आता त्यांचा मुलगा या विश्वविद्यालयाचे नाव बदलणार आहे. सध्या गोपीचंद मालिनीसोबत चित्रपट करत असलेल्या बालकृष्ण यांनी वायसीपी सरकारवर टीका केली आहे. सोबतच आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “एनटीआरच्या उदारतेमुळे राजकिय फायदा घेणाऱ्यांच्या कृत्यावर कुत्रे धोका देणाऱ्या लोकांची खिल्ली उडवत आहेत.”

नागार्जुन आणि बालकृष्णन यांनी केला प्रश्न
अभिनेता नागार्जुन यांनी नुकतेच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात काम केले असून ते आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यानेही सरकारच्या या निर्णयावर आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी थेट सरकारला प्रश्न केला आहे. ते म्हणाले की, “कृष्ण जिल्ह्याचे नाव एनटीआर यांच्यानंतर बदलणे ही माझी मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली होती. नायडू यांना त्यांच्या कार्यकाळात अशा निर्णयाबद्दल विचार का करता आला नाही याचे आश्चर्य वाटत आहे. दोन्हीपैकी मोठे काय आहे? जिल्हा की विद्यापीठ? तेलुगू देसम पक्षाचे आमदार हे तीन दिवसानंतर का प्रतिक्रिया देत आहेत? आमदारांची निवड झाली, तेव्हा ते सभागृहात का उपस्थित नव्हते?” अशाप्रकारच्या प्रश्नांचा भडीमार अभिनेत्यांनी आंध्र सरकारवर केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयाकडे आहेत तब्बल ‘एवढ्या’ चपलांचे जोड; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘दुकानच टाकूया की मग’
‘या’ गुरूंच्या सांगण्यावरून ऐश्वर्या बनली बच्चन कुटुंबाची सून! पाहा बॉलिवूड कलाकारांचे अध्यात्मिक गुरू

हे देखील वाचा