Tuesday, July 9, 2024

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध आणि दिग्गज निर्मात्यांच्या दुखःद निधनामुळे टॉलिवूड शोकसागरात

एकापाठोपाठ एक दमदार चित्रपटांच्या निर्मितीमुळे देशभरात कौतुकाचा विषय असलेल्या साऊथ सिनेसृष्टीसाठी एक दुखःद बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते नारायण दास नारंग (Narayan Das Narang) यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ते 80 च्या दशकातील लोकप्रिय निर्माता होते.  त्यांनी 650 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. वृध्दापकाळाने दास नारंग यांनी हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला असून अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

दिवंगत निर्माते नारायण दास नारंग यांनी 1980 मध्ये चित्रपट फायनान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 650 हून अधिक चित्रपटांना आर्थिक मदत केली आहे. ते हैदराबाद येथील लोकप्रिय मल्टिप्लेक्स समूहाचे अध्यक्षही होते. यापूर्वी ते तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षही होते. नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ आणि नागा सूर्याचा चित्रपट ‘लक्ष्य’ हे त्यांचे अलीकडील चित्रपट होते. याशिवाय त्यांचे इतर चित्रपटही सध्या चर्चेत आहेत. या यादीत नागार्जुन आणि काजल अग्रवाल यांच्या ‘भूत’ चित्रपटासारख्या अनेक चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यात धनुष आणि शिवकार्तिकेयन यांचा शीर्षकहीन चित्रपट आहे. या दिग्गज निर्मात्याच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला असून सुपरस्टार महेश बाबूनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो शेअर करत याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महेश बाबूने आपल्या चित्रपटसृष्टीतील एक विपुल व्यक्तिमत्व असलेल्या नारायण दास यांच्या निधनाने धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची अनुपस्थिती मनापासून जाणवेल. त्यांची चित्रपटसृष्टीबद्दलची आवड आणि आवड आपल्यापैकी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देओ असा भावूक संदेश आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नारायण दास नारंग यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दास यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सुनील नारंग आहे, जो एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा