Saturday, August 2, 2025
Home अन्य ‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

आपल्या सर्वांना ऋषी कपूर यांचा ‘नसीब अपना अपना’ हा चित्रपट आठवत असेल. या सुपरहिट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. अभिनेत्री राधिका सारथकुमार या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या पत्नी चंदोच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. शनिवारी (२१ ऑगस्ट) राधिका आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज आपण त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

राधिका यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली. त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात त्यांनी सोनिया या नावाची भूमिका साकारली होती. (‘Naseeb Apna Apna’ fame actress Radhika Sarathkumar is celebrating her 59th birthday)

‘नसीब अपना अपना’मध्ये केलेली निवड
‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटानंतर राधिका ‘अपना पराया असली नौके’, ‘नसीब अपना अपना’, ‘कुदरत का कानून’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटात त्यांनी ऋषी कपूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती, जी चाहत्यांनी खूप पसंत केली. राधिका शेवटच्या ‘लाल बादशाहा’ या हिंदी चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खूप काम केले आणि स्वतःची ओळख निर्माण केली.

पुढे झाल्या निर्मात्या
राधिका अभिनेत्रीसोबतच पुढे जाऊन निर्मात्याही बनल्या. त्यांनी अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राधिका यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत १ राष्ट्रीय पुरस्कार, ६ फिल्मफेअर, ३ तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, १ सिनेमा एक्सप्रेस पुरस्कार आणि १ नंदी पुरस्कार जिंकला आहे.

एका वर्षाची शिक्षा
मागील काही दिवसांपूर्वीच राधिका आणि त्यांच्या पतीवर एक प्रसंग ओढवला होता. त्यांच्यावर चेक बाऊन्स झाल्याचा आरोप होता. खरं तर २०१४ मध्ये त्यांची कंपनी मॅजिक फ्रेम्सने रेडियन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून काही पैसे घेतले होते. जे त्यांनी चेकद्वारे परत केले. २०१७ मध्ये दिलेला चेक बाउन्स झाला. त्यानंतर त्यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी राधिका आणि त्यांच्या पतीला विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा देखील सुनावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा