Wednesday, June 26, 2024

‘तू बॉलिवूड हिरोसारखा सुंदर नाहीस’, म्हणत नसीरुद्दीन यांना गर्लफ्रेंडने दिलेला धोका; पुढं जे घडलं तो इतिहास

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक नसीरुद्दीन शाह त्यांच्या अतुलनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारख्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नसीरुद्दीन शाह यांनी १९७५ मध्ये चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये नसीरसाहेबांनी एकदा या चित्रपटाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा सांगितला होता. नसीरुद्दीन बुधवारी (दि. २० जुलै) त्यांचा ७२वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया हा किस्सा.

नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या म्हणण्यानुसार, ते दिसायला देखणे नव्हते, म्हणून एके दिवशी त्यांच्या मैत्रिणीने त्यांना असे सांगून सोडले की, “तू बॉलिवूड चित्रपटांच्या हिरोसारखा सुंदर नाहीस.” नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की, देखणा नसल्यामुळे श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात ब्रेक दिला. कारण त्यांना नायक म्हणून हव्या असलेल्या पात्रासाठी मी फिट होतो. माध्यमातील वृत्तानुसार, नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न केले होते.

नसीरुद्दीन शाह यांनी हा विवाह परवीना मुरादशी केला. या लग्नामुळे नसीरुद्दीनच्या कुटुंबीयांना खूप राग आला होता. लग्नाच्या एक वर्षानंतरच त्यांना एक मूल झाले आणि नसीरुद्दीन शाह आणि परवीना हे परस्पर भांडणामुळे वेगळे झाले होते. यानंतर नसीरुद्दीन शाह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या आयुष्याला एक प्रकारचा यू-टर्न देऊन चित्रपटांच्या दुनियेत हरवून गेले.

नसीरुद्दीन शाह यांनी अभिनेत्री रत्ना पाठकसोबत (ratna pathak) दुसरे लग्न केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हे लग्न १९८२ मध्ये झाले होते. या लग्नापासून नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांना इमाद आणि विवान ही दोन मुले आहेत. जर आपण चित्रपटांबद्दल बोललो, तर नसीरुद्दीन शाह आजही ‘द डर्टी पिक्चर’, ‘इश्कियां’, ‘मासूम’, ‘जाने भी दो यारों’, ‘सरफरोश’, ‘त्रिदेव’, ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटांसाठी लक्षात आहेत.

हे देखील वाचा