Wednesday, June 26, 2024

हेट स्पिचवर नसीरुद्दीन शाह यांनी सरकारवर साधला निशाणा म्हणले, “राजनीतिक संवाद कमी…”

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक उत्तम अभिनेते असणारे नसीरुद्दीन शाह खूपच वैचारिक व्यक्ती म्हणून देखील ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या अभिनयासोबतच समजतील विविध मुद्द्यांवर केलेले व्यक्तव्य तुफान गाजतात. नुकतेच नसीरुद्दीन शाह यांनी हेट स्पिचवर भाष्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले, “या मुद्द्यावर सरकारचे मौन हैराण करणारे आहे. हे स्पष्ट दिसत आहे की त्यांनी मौन धारण केले आहे. हा द्वेष सदैव राहिला आहे, तो नेहमीच एक भ्रूण होता, तो नेहमीच फुलण्याची वाट पाहत आहे आणि शेवटी ते पूर्ण झाले आहे. या गोष्टी माझ्या देखील समजण्याच्या पलीकडच्या आहेत. हे सर्व साठून झाले आणि त्याचा आता विस्फोट झाला आहे. सरकारने अतिशय हुशारीने याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला आहे.”

पुढे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की, “आपण त्यांना उलटे लटकवू अशी भाषा हैराण करणारी आहे. मला वाटते की या देशात आता राजनीतिक संवाद कमी झाला आहे. मी नरसंहार आणि मुसलमानांना पाहताचक्षणी मारण्याच्या विधानांना अजिबात गांभीर्याने घेत नाही.”

पुढे नसीरुद्दीन शाह पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हणाले की, ‘ते एक अतिशय हुशार व्यक्ती आहे. त्यांनी ज्या प्रकारे लोकांसमोर त्यांची प्रतिमा तयार केली आहे, ते कौतुकास्पद आहे. या प्रकरणात ते एकटे नाही, तर त्याच्यासारखीच भाषा बोलणारी त्याची मोठी सेना देखील आहे. गुहेत ध्यान करणारा माणूस, कोणाचेही नुकसान न करणारा, सर्वांच्या विकासाविषयी आणि सर्वांच्या प्रयत्नांबद्दल बोलणारा माणूस, मात्र यापैकी एकाही शब्दाचा काहीही अर्थ नाही.”

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

 

हे देखील वाचा