Monday, July 1, 2024

Naseeruddin Shah: …अन् चाहत्यांवर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)चर्चेत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये नसीरुद्दीन शाह एका चाहत्यावर भलतेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर शाह रागाच्या भरात खुप काही बोलून गेले.

खरतंर नसीरुद्दीन शाह(Naseeruddin Shah) क्वचितच विमानतळ किंवा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होतात. त्यामुळे चाहत्यांना त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुरता लागलेली असते. अशातच दोन दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) दिल्ली विमानतळावर दिसले. यावेळी त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता अन् हातात पुस्तक धरले होते.

त्यांना पाहताच चाहत्यांनी त्यांना घेरलं आणि सेल्फी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नसीरुद्दीन शाहंना हे अजिबात पटलं नाही. संतापले आणि चाहत्यांवर आरडाओरडा सुरू केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘तुम्ही लोकांनी खूप चुकीचं काम केलय. माझं मुड खराब केलाय. एखादा माणूस दिसला की तुम्ही त्याला सोडत नाही. तुम्हाला का समजत नाही? अशा शब्दात संताप व्यक्त करत नसीरुद्दीन शाह(Naseeruddin Shah) यांनी चाहत्यांना चांगलचं सुनावलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओ युजर्स नाराज झाले आहेत.

काही युजर्सनी शाह यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे अतिशय वाईट वर्तन आहे. आपले स्टारडम हे प्रेक्षकांमुळेच आहे हे त्यांनी विसरू नये. तर कोणी वाढत्या वयाचा परिणाम म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने त्यांच्या दिसण्यावर कमेंट केली आहे.

नसीरुद्दीन शाह सध्या टीव्ही मालिका ‘शोटाइम’साठी चर्चेत आहे, जी ८ मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. तर काही दिवासांपूर्वी त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर ताशेरे ओढत चित्रपट बघणं बंद केले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

Vikrant Massey: १२ वी फेल फेम विक्रांतच्या लेकाची पहिली झलक; नावही केलं जाहीर

Suhana Khan Buy Property | वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली करोडोंची प्रॉपर्टी

हे देखील वाचा