Thursday, June 1, 2023

राजकीय वादावर तीनही खान गप्प का आहेत? नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले तोंड बंद ठेवण्याचे कारण

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुपूर यांच्या या विधानाविरोधात अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. या सगळ्यांमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनीही नुपूर शर्मांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच अभिनेत्याने बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनाही अडचणीत आणले आहे आणि राजकीय मुद्द्यांवर ते मौन का पाळतात असा सवाल केला आहे. मात्र, सलमान, शाहरुख आणि आमिरने मौन बाळगण्याचे कारणही अभिनेत्याने सांगितले आहे.

नसीरुद्दीन शाह म्हणतात की सलमान, शाहरुख आणि आमिर राजकीय मुद्द्यांवर गप्प बसतात, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे बरेच आहे. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी बॉलिवूडच्या तिन्ही खानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, “मी त्यांच्यासाठी बोलू शकत नाही. तो जिथे आहेत, तिथे मी नाही. मला असे वाटते की जर ते बोलले, तर त्यांचे बरेच काही पणाला लागेल. पण ते त्यांचा विवेक कसा शांत करतात हे मला माहीत नाही. ते लोक आता अशा जागेवर आहेत, जिथे त्यांना खूप काही गमवावे लागेल. (naseeruddin shah reaction salman khan shahrukh and aamir khan silence on bjp nupur sharma controversy)

यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या ड्रग्ज प्रकरणावरही वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, ‘शाहरुख खानसोबत जे काही झालं. शांत राहून त्याने ते सहन केले आहे. त्याने तोंड बंद ठेवले. त्याने ममता बॅनर्जींचे कौतुक केले आणि केवळ तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला. तसेच सोनू सूदकडे छापा टाकला गेला. आता जो कोणी असे विधान करेल, त्याला अशा गोष्टी सामोरे जावे लागेल. पुढचा नंबर माझाही असू शकतो.”

काय आहे प्रकरण?
नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान मुस्लिम धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर देशभरातील मुस्लिम लोकांनी नुपूरविरोधात संताप व्यक्त केला. त्याचवेळी भाजपनेही नुपूर यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. इतकंच नाही, तर मुस्लिम देशांनीही नुपूरच्या अपमानास्पद वक्तव्याला विरोध केला आहे. नुपूर शर्माच्या वक्तव्यावर कुवेत, कतार आणि इराणसारख्या अनेक देशांनी संतापाची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर भाजपकडून एक निवेदन जारी करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याबाबत सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा