Saturday, June 29, 2024

नताशा स्टॅन्कोविकने स्वीकारले डोन्ट रश चॅलेंज; पती व मुलासह लावले जोरदार ठुमके

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच नताशाने आपला मुलगा अगस्त्य आणि पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डोन्ट रश चॅलेंजवर थिरकताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये नताशा अतिशय स्टाईलिश अंदाजामध्ये मुलगा आणि पतीसोबत दिसत आहे. नताशा आणि हार्दिक पंड्या यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अलीकडेच नताशा स्टॅन्कोविकने पती हार्दिक पंड्या आणि मुलगा अगस्त्य यांच्याबरोबर सुट्ट्या घालवतानाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंनाही चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.

नताशा स्टॅन्कोविकने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बिग बॉस 8’ आणि ‘नच बलिये’ यांसारख्या रियॅलिटी शोमधून नताशाने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. सन 2016 मध्ये ती सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘7 आवर टू गो’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात, तिने एका अधिकाऱ्याची भूमिका साकारली आणि तिने अ‍ॅक्शन सीनही दिले होते. 2017मध्ये, ती ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटातील लोकप्रिय आयटम साँग “मेहबूबा” मध्ये दिसली होती, ज्यासाठी तिचे खूप कौतुक केले गेले. ‘डीजे वाले बाबू’ गाण्यात बादशाहबरोबरच्या तिच्या डान्सने तर सर्वांना वेड लावले होते. तिने 2020 मध्ये हार्दिक पंड्याशी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा