Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिकाची आत्महत्या, ‘देवदूत’ सोनूने पाठवली होती ‘इतक्या’ लाखांची जर्मन रायफल

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिकाची आत्महत्या, ‘देवदूत’ सोनूने पाठवली होती ‘इतक्या’ लाखांची जर्मन रायफल

अभिनेता सोनू सूदने कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत अनेक गरजूंना मदत केली आहे. मात्र, सोनूने मदत केलेल्या एका राष्ट्रीय नेमबाज खेळाडूबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनबाद येथील राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकने आत्महत्या केली आहे. तिने फाशी घेत आपले आयुष्य संपवले आहे. ती अवघ्या २६ वर्षांची होती. आता तिच्या निधनामुळे सोनूचे हृदय तुटले आहे. अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर त्याचे चाहतेही कोनिकाला श्रद्धांजली वाहत आहेत.

सोनू सूदने (Sonu Sood) कोनिकाच्या निधनाची एक बातमी रिट्विट केली आहे. त्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज केवळ माझेच नाही, केवळ धनबादचे नाही, तर संपूर्ण देशाचे हृदय तुटले आहे.”

 

नेमबाज कोनिका (Konica Layak) मागील एक वर्षापासून माजी राष्ट्रीय खेळाडू जयदीप प्रमाकर यांच्या कोलकाताच्या उत्तर पाडा येथील कँपमध्ये ट्रेनिंग घेत होती. यादरम्यानच ती गुजरात येथे ट्रेनिंगसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत छेडछाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणाबाबत कोनिकावर कोणता दबाव होता की नव्हता, याचाही तपास पोलीस करत आहेत.

कोनिकाचे प्रशिक्षकासोबतचे संबंध चांगले नसल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. अशा परिस्थितीत पोलीस प्रशिक्षकाचीही चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती कोनिकाचे वडील पार्थो लायक यांना देण्यात आली. त्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, कोनिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाने हंबरडा फोडला.

ट्वीट करत सोनूकडे मागितली होती मदत
कोनिकाची घरातील परिस्थिती हालाखीची होती. तिच्याकडे रायफल नसल्यामुळे तिला आपल्या मित्रांकडून रायफल उधार मागून स्पर्धेत सहभाग व्हायची. इतकेच नव्हे, तर तिने रायफलसाठी अभिनेता सोनू सूदकडे ट्विटरमार्फत मदत मागितली होती. यानंतर सोनूने कोनिकाला अडीच लाखांची जर्मन रायफल पाठवली होती. सोनूने १० मार्च रोजी कोनिकाला रायफल देण्याचे वचन दिले होते. तिने म्हटले होते की, सोनूने व्हिडिओ कॉल करून तिच्यासोबत चर्चाही केली होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा