२००५ साली आलेला नवरा माझा नवसाचा हा मराठीतील एक क्लासिक कॉमेडी चित्रपट मानला जातो. याचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. या सिनेमातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना चांगलेच स्मरणात आहेत. सोशल मिडीयावर देखील चित्रपटाशी निगडीत अनेक मिम्स बघायला मिळतात.
या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार बघायला मिळाले होते. तसेच या सिनेमात गणपतीपुळे येथील सुंदर लोकेशन्स सुद्धा बघायला मिळाली होती. पण हा सगळा खर्च एकूण किती होता? अर्थात चित्रपटाचं एकूण बजेट किती होतं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर एकूण किती कोटींचा व्यवसाय केला होता याबाबत आदिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकताच एका मुलाखतीत उलगडा केला आहे.
सचिन पिळगावकर यांनी संगीतले कि २००५ साली नवरा माझा नवसाचा हा चित्रपट एकूण ८० लाख रुपयांच्या बजेट मध्ये बनला होता. तर रिलीज नंतर दमदार प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाने एकूण ५ कोटींची कमाई त्याकाळी केली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, सुनील तावडे, प्रदीप पटवर्धन, मधुराणी प्रभुलकर, रीमा लागू, जॉनी लिव्हर, विजय पाटकर, कुलदीप पवार इत्यादी कलाकारांनी अभिनय केला होता. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होत असून त्यातही अशोक सराफ, सचिन, सुप्रिया, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव आदी कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
आलियासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली राहा; कॅमेरा पाहून दिले क्यूट एक्स्प्रेशन