Wednesday, July 3, 2024

महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनुष्का आणि विराटची मुलगी १० महिन्यांची होईल मात्र अजूनही त्यांनी तिचा चेहरा जगाला दाखवला नाही. त्यामुळे चाहत्यांना नेहमीच त्यांच्या मुलीबद्दल उत्सुकता असते. अनुष्काने नुकताच महाअष्टमीच्या मुहूर्तावर मुलगी वामिकाचा एक गोड फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे. आई आणि मुलीचा हा फोटो खूपच सुंदर आणि नॅचरल आला आहे. या फोटोत अनुष्का आपल्या मुलीला प्रेमाने बघताना आणि तिचे लाड करताना दिसत आहे. पण पुन्हा एकदा वामिकाचा चेहरा अनुष्काने दाखवलेले नाही. कारण अनुष्काने शेअर केलेला वामिकाचा फोटो पाठमोरा आहे.

अनुष्का शर्माने वामिकासोबत फोटो शेअर करताना लिहिले, “तू दररोज मला अधिक मजबूत करत आहेस. मला आशा आहे की, प्रत्येक दिवशी आई दुर्गा तुझ्यामध्ये वास करो, माझी छोटी वामिका, अष्टमीच्या शुभेच्छा.” अनुष्का आणि तिच्या मुलीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट दोघांनीही वामिकाचा चेहरा अजूनही लपवून ठेवला आहे.

 

अलीकडेच अनुष्का शर्मा एका नवीन जाहिरातीसाठी विराट कोहलीची फोटोग्राफर बनली होती. हातात फोन घेऊन अनुष्का या जाहिरातीमध्ये विराटचे फोटो काढताना दिसली. विराट कोहलीची खरी बाजू देखील अनुष्का सर्वांना दाखवली. जाहिरातीच्या व्हॉईसओव्हरमध्ये, अनुष्का असे देखील म्हणाली, “लोक नेहमी विराट कोहलीला मैदानावर पाहतात. मी त्याला रोज यापेक्षा थोड वेगळे पाहते. मला त्याची खरी बाजू माहीत आहे. एक बाजू जी फक्त मलाच माहीत आहे. दररोज एक नवीन कहाणी फक्त माझ्यासाठी. त्याच्यामध्ये मला पॅशन आणि शांततेचे एक नवीन संतुलन दिसते. तो मजेदार आहे, काळजी घेणारा आहे, पॅशनमध्ये अनेक लेयर्स समाविष्ट आहेत. पोर्ट्रेटद्वारे ही विराट कोहलीची कहाणी आहे. ”

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. इटलीमध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघेही बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. याच वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुलगी वामिकाचे आई- बाबा झाले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

हे देखील वाचा