Saturday, June 29, 2024

‘या’ टॉप 5 बॉलीवूड क्लासिक गाण्यांसह साजरा करा यंदाच्या नवरात्रीत गरबा, पाहा यादी

नवरात्रीचा सण हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. या सणात दुर्गादेवीची पूजा केली जाते आणि गरबा खेळला जातो. गरबा हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे जो गुजरातमध्ये लोकप्रिय आहे. गरबा खेळताना लोक विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करतात. गुजराती गाण्यांसोबतच बॉलिवूड गाण्यांचीही गरबा खेळताना खूप क्रेझ पाहायला मिळते. या सणासुदीच्या काळात अशाच काही बॉलिवूड गाण्यांबद्दल जाणून घेऊया, जे प्रत्येक वेळी गरबाच्या रात्रीची मोहकता वाढवतात.

नगाड़ा संग ढोल बाजे
‘गोलियों की रासलीला राम लीला’ हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच असेल. लोकांना या चित्रपट चांगलीच पसंती दर्शवली होती. त्याच्यातील गाणीही तितकीच सुपरहिट झाली. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला होता . या चित्रपटात ‘नगाड़ा संग ढोल बाजे’ हे गाणे आहे जे गरब्याच्या वेळी लावले दाते. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसले होते. श्रेया घोषाल आणि उस्मान मीर यांच्या आवाजातील हे गाणे लोकांना गरबा करायला भाग पाडते.

ढोलिडा
2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून आयुष शर्माने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर काही खास कमाई केली नाही, मात्र या चित्रपटातील गाणी लोकांना खूप आवडली. या चित्रपटातील ‘ढोलिडा’ हे गाणे गरब्याच्या ( navratri special songs ) वेळी खूप ऐकले जाते. गाण्याचे बोलच नाही तर व्हिडीओमध्ये स्टार्स दांडिया खेळताना गरबा करतानाही दिसत आहेत. गंगूबाई काठियावाडी नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा हे गाणं देखील फार दमदार आहे. या गाण्यात आलिया भट्टचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांच्या समोर आला होता. हे गाणे नेहा कक्कर, पलक मुच्छाल , उदित नारायण आणि राजा हसन यांनी गायले आहे .

उरी उडी जाये
2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, माहिरा खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील ‘उरी उडी जाये’ हे गाणे लोकांना खूप आवडते. सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेदी, करसन सगाठिया यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

सनेडो
2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसले होते. मिखिल मुसळे दिग्दर्शित हा एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटातील ‘सनेडो’ हे गाणे गुजराती लोकगीतांवर आधारित आहे. हे गाणे गरब्याच्या वेळीही खूप ऐकले जाते. हे गाणे मिका सिंग, निकिता गांधी आणि बेनी दयाल यांनी गायले आहे.

बूम पाडी
2022 साली प्रदर्शित झालेल्या ‘मजा मा’ चित्रपटातील ‘बूम पडी’ हे गाणे देखील गरब्याच्या वेळी लोकांना खूप आवडते. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता, त्यामुळे या गाण्याला यावेळी अधिक क्रेझ मिळू शकते. गाण्यातही अभिनेत्री माधुरी दीक्षित गरब्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. ( navratri special bollywood best dandiya songs to play dandiya)

आधिक वाचा-
‘लागीरं झालं जी’फेम अभिनेत्रीच्या बोल्ड लूकने वेधलं लक्ष; स्विमिंगपूलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी झाली मोठी चोरी, पोलिसात तक्रार दाखल

हे देखील वाचा