अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली ही आज चित्रपटसृष्टी पासून खूप दूर आहे. पण तरी देखील सोशल मीडियावर तिचा चांगला वावर असतो. नव्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याऐवजी एक व्यावसायिका बनण्याचे ठरवले आहे. नव्या ही इंडियन आयडल या शोची खूप मोठी चाहती आहे. तिने या शोमधील एक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आणि सांगितले की, ती कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करत आहे.
https://www.instagram.com/p/CMwe4v4MBuo/?utm_source=ig_web_copy_link
या शनिवारी (५ जून) उदित नारायण आणि अभिजित भट्टाचार्य हे खास पाहुणे आले होते. या एपिसोडमध्ये सवाई भट्टने ‘उड जा काले कावां’ हे गाणे गायले होते. त्याने हे गाणे उदित नारायण सोबत गायले होते. नव्याने सवाईचा फोटो शेअर करून हात वर केल्याची ईमोजी शेअर केली आहे.
सवाई भट्ट हा नव्याचा आवडता स्पर्धक आहे. त्याला शुभेच्या देण्यासाठी नव्याने त्याचा हा व्हिडिओ तिच्या इंन्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या व्हिडिओवर सवाईचे चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. सवाईचा प्रवास ऐकून उदित नारायण देखील त्याच्याकडे आकर्षित झाले होते. उदित नारायण यांनी या शोमध्ये सांगितले की, “लहानपणी माझा आवडता छंद कटपुतली बघणे हा होता. मी ते बघण्यासाठी माझे किती तरी तास वाया घालवत असेल. त्यामुळे मला असे वाटते की, सवाई सोबत माझे एक वेगळेच नाते आहे. शोच्या सुरुवाती पासून त्याच्यात सुधारणा झाली आहे. ती खूप चांगली आहे. मी गर्वाने ही गोष्ट सांगतो की, सवाई या इंडियन आयडलच्या फायनलमध्ये असणार आहे.”
नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण ती ट्रोलरला देखील खणखणीत शब्दात उत्तर देत असते. ती तिच्या मित्र मैत्रीणींसोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने सुहाना खानच्या वाढदिवशी पोस्ट शेअर केली होती. जी चांगलीच व्हायरल झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…