Saturday, April 12, 2025
Home अन्य वयाच्या १२ व्या वर्षी झाली मुलगी असल्याची जाणीव, पुढे मॉडेल बनून नव्या सिंग बनली समाजापुढे आदर्श

वयाच्या १२ व्या वर्षी झाली मुलगी असल्याची जाणीव, पुढे मॉडेल बनून नव्या सिंग बनली समाजापुढे आदर्श

बिहारमधील कतीहरमधील एका सिख परिवारात जन्मलेले नव्या सिंग जन्मापासूनच एक मुलगा होती. परंतु तिच्या आस्तित्वाला एक नवीन ओळख देण्याची हिम्मत ठेवणारी ती आज एक मॉडेल, अभिनेत्री आणि मिस इंडिया ब्युटी पेजेंटची ब्रांड एम्बेसदर आहे. जी आज अनेकांसाठी एक प्रेरणा आहे. मुलाच्या शरीराने जन्मलेल्या नव्याला काही काळाने जाणीव झाली की, तिच्या आत्मा मुलीचा आहे. या या सगळ्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करायला लागला आहे. नव्याने १४ – १५ वर्षाची असताना तिच्या आईसोबत ही गोष्ट शेअर केली होती की, ती तिच्या शरीरामध्ये खुश नाहीये. तिला एक मुलगी म्हणून आयुष्य जगायचे आहे. यावर तिच्या आईने उत्तर दिले होते की, तिला खूप संघर्ष करावा लागणार आहे आणि या लढाईत तिला कोणीही साथ देणार नाही. तिच्या आईचे हे बोलणे तिच्या मनाला खूप लागले होते.

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मुलापासून एक मुलगी बनण्याचा प्रवास सांगितला. नव्याने सांगितले की, वयानुसार ती जस जशी मोठी होत गेली, तसे तिला समजायला लागले की, तिचे वागणे एका मुलीप्रमाणे आहे. त्यामुळे सगळे तिची चेष्टा करायचे. तिने सांगितले की, ती १२ वर्षाची असताना तिला पहिल्यांदा जाणवले की, ती मुलगी आहे. आई-वडीलसोबत कुठे गेल्यावर लोक माझी मजा करायचे. यामुळे त्यांना लाज वाटायची. मुलींसारखे राहणे माझ्या वडिलांना अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते अजिबात मला साथ देत नव्हते. परंतु माझ्या आयुष्यात माझ्या आईने नेहमीच मला पाठिंबा दिला.” ( Navya Singh Indias first transwomen pagent navya sungh who is branding miss transqueen for four years as model)

नव्याने पुढे सांगितले की, “नंतर मी माझ्या आई वडिलांना मुंबईला घेऊ आले. जिथे डॉक्टरांनी दोघांचे काऊन्सिल ग केले. यानंतर माझे वडील बाहेर आहे आणि मला मिठी मारली. तेव्हा ते म्हणाले की, मुलगा असो किंवा मुलगी तू माझं बाळ आहे. त्यावेळी ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कारण त्यांना मला स्वीकारले होते. तिने सांगितले की, त्यावेळी मला स्वतःशी लढा द्यायचा होता त्यामुळे तो माझ्यासाठी कठीण काळ होता. स्वताला ओळखणे हीच आपल्या आयुष्याची मोठी लढाई होती. जर तुम्हीही लढाई जिंकली तर तुम्ही एक खिलाडी असता.”

तिने सांगितले की, “मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की, देवाने सगळ्यांना आयुष्य दिले आहे. त्यामुळे आपण कोणाचेही परीक्षण करू शकत नाही. आपल्याला सगळ्यांवर प्रेम केले पाहिजे. यासोबतच मी त्या पालकांना देखील सांगू इच्छिते की, “ही अशी मुलं आहेत ज्यांना तुम्हीच जन्म दिला आहे. जर तुम्ही त्यांना सोडले तर तुम्ही सगळ्यात मोठे गुन्हेगार आहात. यानंतर तिने सांगितले की, मुलगी झाल्यानंतर २०१६ मध्ये भारताचे मुख्य मॅगझिनवरून मॉडेल म्हणून ऑफर मिळाली. त्यानंतर मी हळुहळू पुढे जाऊ लागले. त्यावेळी मी सावधान इंडियामध्ये ट्रान्सवूमन मोना हे पात्र निभावत होते.

त्यानंतर २०१७ मध्ये मला मिस ट्रान्स क्वीन इंडिया ब्युटी पेजेंटबाबत माहिती मिळाली. ज्याचे मी ऑडिशन दिले. हा भारताचा पहिला ट्रान्स वूमन ब्युटी पेजेंट होते. ही पहिल्यांदाच आयोजित केला होता. या स्पर्धेत टॉप ५ मध्ये मी सामील झाले होते. त्यानंतर लोकांनी मला मिस ट्रान्स क्वीनची ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. यासोबत मी सेक्स रॅकेटवर आधारित एका बायोपिक चित्रपटात देखील काम केले. ही बायोपीक लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये देशातील पहिली ट्रान्सवूमन आयटेम नंबर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा