Thursday, November 21, 2024
Home साऊथ सिनेमा देवदर्शनाला गेलेली नवविवाहित जोडी अडचणीत, तिरुपती मंदिराने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर विघ्नेशने मागितली जाहीर माफी

देवदर्शनाला गेलेली नवविवाहित जोडी अडचणीत, तिरुपती मंदिराने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर विघ्नेशने मागितली जाहीर माफी

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (nayanthara) आणि विघ्नेश शिवनचा (Vignesh Shivan) शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. लग्नानंतर त्यांनी जोडीने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली होती. पण या भेटीवेळी झालेल्या चुकीमुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश अडचणीत सापडले आहेत. 9 जून रोजी लग्नानंतर लगेचच दोघेही तिरुपती बालाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री नयनताराने मंदिरातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर आता तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीचे मुख्य दक्षता सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

तिरुपती बालाजी मंदिराचे ट्रस्टी नरसिंह किशोर यांनी नयनतारावर आरोप करताना सांगितले की,”नयनतारा यावेळी चप्पल घालून मंदिर परिसरात फिरत होती. आमच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना लगेच थांबवले. आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे आढळून आले की, दोघांनी नियम मोडून तेथे फोटोशूट केले, ज्याला मंदिर आवारात बंदी आहे. येथे वैयक्तिक कॅमेरे वापरण्याची परवानगी नाही. आम्ही नयनताराला नोटीस पाठवत आहोत. आम्ही त्यांच्याशी फोनवरही बोललो आहोत. व्हिडीओ संदेश देऊन भगवान बालाजी, मंदिर समिती आणि भाविकांची माफी मागायला तयार आहे. मात्र, असे असतानाही आम्ही त्यांना नोटीस पाठवू,”

या सर्व प्रकारानंतर विघ्नेशने मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माफी मागित “लग्नानंतर लगेचच घरी न जाता थेट तिरुपती मंदिरात गेलो. तिथे आम्हाला खूप लोकांनी गर्दी केली. म्हणून तिथून पुढे निघालो आणि थोड्या वेळाने परत एझुमलयन मंदिरासमोर आलो. आम्ही घाईघाईने फोटोशूट पूर्ण केले आणि निघण्याचा निर्णय घेतला कारण चाहत्यांनी आम्हाला पाहिले असते तर त्यांनी गर्दी केली असती,” असे स्पष्टिकरण दिले आहे.

विघ्नेश पुढे म्हणाला, “हे सर्व केल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्ही चप्पल घालून चालत होतो, जिथे पादत्राणे घालण्यास मनाई आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. गेल्या महिन्यात आम्ही पाच वेळा तिरुपतीला गेलो होतो कारण आम्ही तिथे लग्न करण्याचा विचार करत होतो. पण विविध कारणांमुळे तिथे लग्न होऊ शकले नाही. विघ्नेशने यापूर्वी एका मुलाखतीत तिरुपतीमध्ये लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ‘मी आणि नयनतारा आधी तिरुपतीमध्ये लग्नाची योजना आखत होतो. पण नंतर आम्ही आमचा प्लॅन बदलला. कारण माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना तिथे घेऊन जाणं खूप अवघड होतं. त्यामुळेच आम्ही आमचा विवाह सोहळा चेन्नईजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला,”

दरम्यान विघ्नेशचा ‘कथुवाकुला रेंडुकधाळ’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यात विजय सेतुपती, नयनतारा आणि समंथा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात जबरदस्त रोमँटिक ड्रामा आहे. विघ्नेशच्या दिग्दर्शनाखाली नयनताराचा हा दुसरा चित्रपट आहे. दुसरीकडे, नयनताराबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘O2’ चित्रपट 17 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

दोन हजारच्या नोटेत चीप आहे का?’ अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, महिलेचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

राम चरणच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण, कॅमेऱ्यासमोर राखी सावंतला कोसळले रडू ,पाहा आजचे ५ व्हायरल व्हिडिओ

अय्यो! फक्त एक फोटो पोस्ट करायचे कलाकार घेतात कोट्यवधी रुपये, वाचा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा