Thursday, July 18, 2024

नयनताराने दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवली जुळ्या मुलांची पहिली झलक; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा(Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश(Vignesh)  हे त्यांच्या लग्नापासून नेहमीच चर्चेत आहेत. नयनताराचे साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना जुळी मुले झाल्याची चाहत्यांना गोड बातमी त्यांनी दिली आहे. जुळ्या मुलांचे आई-वडील झाल्याची घोषणा केल्यानंतर ते दोघेही चर्चेत आले. आता नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे. त्यानंतर आता त्यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मुलांची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

विघ्नेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.त्यात विघ्नेशने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्हा सर्वांना आमच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! देवावर विश्वास ठेवा आणि प्रेम करा. सर्व काही व्यवस्थित चालेल याची खात्री विश्व नेहमीच देत असतं”. या फोटोत विग्नेश, नयनतारा आणि त्यांची दोन्ही मुले दिसत आहेत. यात नयनताराने केशरी रंगाची साडी नेसली असून विग्नेशने लाल रंगाचा कुर्ता आणि लुंगी नेसली आहे. तसेच नयनताराने तिच्या हातात एका मुलाला धरले आहे आणि विग्नेशने त्याच्या हातात दुसऱ्या मुलाला धरले आहे. त्यांच्या हा फोटो सध्या खूप व्हायरल होत असून त्यांचे चाहतेही त्यांच्या मुलांची झलक पाहून खुश झाले आहेत. या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटींसुद्धा कमेंट्स केले आहे. सध्या हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

 त्यांच्या जुळ्या मुलांच्या आगमनानंतर, अनेकांनी त्यांच्या सरोगसीबद्दल चिंता व्यक्त केली आणि या जोडप्याने कायदे पाळले आहेत का असा प्रश्न केला. माध्यमाच्या वृत्तानुसार, या जोडप्याने तामिळनाडूच्या आरोग्य विभागाकडे प्रतिज्ञापत्र आणि विवाह प्रमाणपत्र सादर केले आणि दावा केला की त्यांनी सहा वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाची नोंदणी केली होती. सरोगेट युनायटेड अरब अमिरातीमधील नयनताराचा नातेवाईक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 2021 च्या सरोगसी कायद्यानुसार, भारतात व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी आहे. डिसेंबर 2021 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला. ते 25 जानेवारी 2022 रोजी भारतात लागू झाले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी 9 जूनला थाटामाटात लग्न केलं होतं आणि त्यानंतर 4 महिन्यातच दोघंही आई- बाबा झाले आहेत. पण नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी आपल्या बाळांची नावं उईर आणि उलगम अशी ठेवली आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

प्रभासच्या चाहत्यांनी केला कहर; चक्क चित्रपट गृहातच वाजवले फटाके अन् …

हे देखील वाचा