दाक्षिणात्य सिने जगतातील लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि निर्माता विघ्नेश शिवम (Vignesh Shivam) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. अनेक महिने त्यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू होती. या चर्चांना पुर्णविराम देत दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या शाही विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. आता या दोघांच्याही हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री नयनतारा तिचा दिग्दर्शक पती विघ्नेश शिवनसोबत हनीमूनसाठी थायलंडला पोहोचली आहे. विघ्नेशने त्याच्या इंस्टाग्रामवर हनीमूनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. नयनताराचा पती शिवम विघ्नेशने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.सोबत त्याने थायलंडमध्ये माझ्या स्पेशल व्यक्तीसोबत असा गोड कॅप्शन दिला आहे. या पोस्टमध्ये विघ्नेशने विघ्नेशने तो थायलंडमधील सियाम हॉटेलमध्ये राहत आहेत असेही सांगितले आहे.
फोटोंमध्ये विघ्नेश आणि नयनतारा एकमेकांच्या मिठीत खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या हनिमूनचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ज्यावर त्यांच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोमधील नयनताराच्या सौंंदर्याने सर्वांंनाच घायाळ केले आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की नयनताराने पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे ज्यामध्ये ती अगदी सिंपल लूकमध्ये आहे. दुसरीकडे, विघ्नेश खालच्या टी-शर्टमध्ये खूपच मस्त दिसत आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांचा विवाह ९ जून रोजी झाला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
दरम्यान अभिनेत्री नयनतारा ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. जे तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसत असतात. विघ्नेशसोबतच्या प्रेमप्रकरणाआधी नयनताराचे नाव प्रभूदेवासोबतही जोडले गेले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा-
- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर समंथाने दिली चैतन्यच्या नव्या नात्यावर प्रतिक्रिया; म्हणाली, ‘हे खरं पाहिजे’
- कलाविश्व हादरलं। लोकप्रिय कन्नड अभिनेत्याची निर्घृण हत्या, काही दिवसांपूर्वीच झाला होता पत्नीचाही मृत्यू
- भल्याभल्यांना गार करणाऱ्या राखीचा जॉनी लिव्हरच्या मुलीलाही दणका, ‘हे’ काम करताना सापडली रंगेहात