Wednesday, August 6, 2025
Home साऊथ सिनेमा लग्नाचे औचित्य साधत नयनतारा आणि विघ्नेश यांचा स्तुत्य उपक्रम, लहान मुलांना देणार पोटभर जेवण

लग्नाचे औचित्य साधत नयनतारा आणि विघ्नेश यांचा स्तुत्य उपक्रम, लहान मुलांना देणार पोटभर जेवण

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा अर्थात साऊथची लेडी सुपरस्टार आज (९ जून) रोजी साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नबंधनात अडकली. महाबलिपुरम येथे नयनतारा आणि विग्नेश यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होत आहे. नयनताराच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मागील ७ वर्षांपासून नयनतारा आणि विग्नेश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला पुढच्या पायरीवर नेत एक नवीन सुरुवात केली आहे.

आपल्या नवीन आयुष्याशी सुरुवात मोठ्यांच्या, चाहत्यांच्या, शुभचिंतकांच्या,आप्तस्वकीयांच्या आशीर्वादसोबतच काही चांगले काम करून करायची असे या दोघांनी ठरवले होते. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम देखील राबवले आहे. या नयनतारा आणि विघ्नेश या दोघांनी १८००० मुलांना आणि तामिळनाडूमधील एक लाख लोकांना जेऊ घालणार आहे. आपल्या लग्नाचे औचित्य साधत त्यांनी हे उत्तम आणि चांगले काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांची भूक भागवत त्यांचे अनमोल आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी हे काम केले आहे.

नयनतारा आणि विग्नेश या दोघांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वच लोकं आनंदित झाले असून, त्या दोघांना अनेकानेक आशीर्वाद देत आहेत. तब्बल १८००० मुलांची भूक भागवत त्यांना पोटभर जेवण देणे हे खरंच खूपच मोठे आणि पुण्याचे काम आहे. नयनतारा आणि विग्नेश यांच्यासाठी हा दिवस अतिशय अविस्मरणीय आहेच मात्र या कामामुळे तो अधिकच मूल्यवान ठरणार आहे. ९ जून सकाळपासूनच या दोघांच्या लग्नाचे विधी सुरु झाले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी सप्तपदी चालत एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी गाठ बांधली.

साऊथ चित्रपटसृष्टीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखले जाते. तिने अतिशय गाजलेल्या आणि तुफान लोकप्रिय झालेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची देशासोबतच परदेशातही तुफान फॅन फॉलोविंग आहे. नयनतारा आणि विग्नेश यांनी २०१५ मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लग्नात दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अनेक मोठे कलाकार सहभागी झाले असून, त्यात विजय सेतुपति, दिग्दर्शक मणिरत्नम, अभिनेता सूर्या, कार्थी, अभिनेत्री ज्योतिका बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान यांचा समावेश आहे. लवकरच नयनतारा आणि शाहरूख खान ‘जवान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा