Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात दिवंगत अभिनेता सुशांतच्या जवळच्या मित्राला एनसीबीकडून अटक; नुकताच झाला होता साखरपुडा

मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात दिवंगत अभिनेता सुशांतच्या जवळच्या मित्राला एनसीबीकडून अटक; नुकताच झाला होता साखरपुडा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रक विभागाने (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो NCB) सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे. पिठाणीला एनसीबीच्या टीमने हैदराबादमधून अटक केली आहे. एनसीबीची टीम सिद्धार्थ पिठाणीला मुंबईला घेऊन येत आहे, जिथे त्याची चौकशी केली जाईल.

खरं तर सुशांतच्या निधनानंतर त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक लोकांचे नाव समोर आले होते. या लोकांपैकीच एक म्हणजे त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी होय. सिद्धार्थ सुशांतसोबतच राहायचा. सुशांतची मृतदेह पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये सिद्धार्थही होता.

सिद्धार्थ पिठाणी होता सुशांतचा जवळचा मित्र
सिद्धार्थ पिठाणी सुशांतच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता. सुशांतच्या घरामध्येच तो राहत होता. सुशांतच्या शेवटच्या दिवसात सिद्धार्थ त्याच्या जवळ होता, त्यामुळे पोलीस आणि सीबीआयने सिद्धार्थशी चौकशी केली. सिद्धार्थ या कारवाईमध्ये सतत आपली विधाने बदलायचा.

नुकताच झाला होता साखरपुडा
सिद्धार्थचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर ‘जस्ट एंगेज्ड, नवीन प्रवासाची सुरुवात,’ असे लिहिले होते.

१४ जूनला हैराण झाले होते सर्वजण
सुशांत सिंग राजपूत १४ जून, २०२० रोजी आपल्या घरात मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि त्यानंतर पटना पोलिसांनी केला. तरीही सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. दुसरीकडे या प्रकरणात ड्रग्ज प्रकरणही समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह अनेक लोकांना एनसीबीने अटक केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा