Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

आर्यन खानसोबत सेल्फीमध्ये नेमकं आहे तरी कोण? व्हायरल फोटोवर एनसीबीने दिली प्रतिक्रिया

क्रूझवर चालू असलेल्या अंमली पदार्थांच्या पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर, तो चांगलाच चर्चेत आला आहे. एनसीबीने त्याला रविवारी (३ ऑक्टोबर) अटक केली आहे. न्यायालयाने आर्यनसह इतर तीन आरोपींना एका दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे. अशातच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक माणूस आर्यन खानसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. आता या व्हायरल होत असलेल्या फोटोवर एनसीबीचे विधान आले आहे.

असे मानले जात होते की, हा फोटो आर्यन खानच्या चौकशीपूर्वी म्हणजेच, तो एनसीबी ताब्यात असताना घेण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्स त्या व्यक्तीला एनसीबीचे कर्मचारी असल्याचे समजत होते. मात्र, आता एनसीबीने स्पष्ट केले आहे की, आर्यन खानसोबत या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही. (ncb clarifies man in picture with aryan khan is not ncb officer or employee)

दुसरीकडे हा फोटो कुठे काढला गेला आणि ही व्यक्ती कोण आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण हा फोटो व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागला नाही. अशा परिस्थितीत तपास यंत्रणेने परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी अधिकृत निवेदन जारी केले.

तीन आरोपींना पाठवण्यात आले एनसीबीच्या कोठडीत
न्यायालयाने आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबी कोठडीत पाठवले आहे. एनसीबीने दोन दिवसांची कोठडी मागितली होती, पण न्यायालयाने त्यांना एका दिवसासाठी पाठवले. 

आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्यांच्या क्लायंटला क्रूझ शिपवर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आमंत्रित केले होते. ते म्हणाले, “क्लायंटकडून (आर्यन) गुन्ह्यातील सहभागाची माहिती देणारी कोणतीही सामग्री सापडली नाही. ना त्याने बंदी घातलेली सामग्री जवळ ठेवली होती ना त्याचे सेवन केले होते.”

महत्त्वाचे म्हणजे, आर्यन खानविरोधात कलम- २७ (मादक पदार्थ सेवन करणे), ८ सी (मादक पदार्थांचे उत्पादन, बाळगणे, खरेदी करणे किंवा विकणे) आणि एनडीपीएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन आणि इतर सात जणांना एनसीबीने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छाप्यामध्ये ताब्यात घेण्यात आले. 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा