Monday, June 17, 2024

आर्यन खानच्या कारवाईनंतर, अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रथमच दिली पती समीर वानखेडेंच्या कामावर प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांची चौकशी झाली. यातच एनसीबीच्या हाती अंमली पदार्थांचे धागेदोरे लागत गेले. गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीला अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अंमली पदार्थांचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

जेव्हापासून अंमली पदार्थांची प्रकरणे समोर येत आहेत, तेव्हापासून एक नाव सतत चर्चेत असतं. ते म्हणजे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचं. आपल्या कौतुकास्पद कामगिरीने ते सर्वांची वाहवा मिळवत आहेत. तुम्हाला माहीतच असेल की, समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत. क्रांतीलाही आपल्या पतीच्या कामगिरीचा अभिमान आहे. नुकतेच तिने वानखेडे यांच्या कामाबद्दल खुलासे केले आहेत. (ncb sameer wankhede actress wife kranti redkar reveals how he spends time at home says she is proud of him for sacrifices made for the nation)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली की, “एक पत्नी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. ते खूप मेहनती आहेत. त्यांनी या पूर्वीही अशी अनेक प्रकरणे हाताळली आहेत. पण आता हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असल्यामुळे, याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेव्हा समीर एखादे प्रकरण हाताळत असतात, तेव्हा मी त्यांना त्यांचा पूर्ण वेळ देते. मी कधीच त्यांना काय सुरू आहे किंवा कसे सुरु आहे, असे प्रश्न विचारत नाही. मी घरातील सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते, जेणेकरुन त्यांना त्यांच्या कामाकडे लक्ष देता येईल. कधीकधी समीर कामात इतके व्यस्त असतात की, मोजून २ तास झोप घेतात. कामासंबंधी फोन सुरू असताना मी कधीही त्यांना कोणते प्रश्न विचारत नाही. ते त्यांच्या सिक्रेट ऑपरेशनवर काम करत असतात. कुटुंबीयांनाही ते कधीच याबाबत माहिती देत नाहीत. मी त्यांच्या कामाचा आदर करते आणि याबाबत कधीच तक्रार करत नाही.”

क्रांती रेडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती मराठी सिनेसृष्टीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २००० साली ‘सून असावी अशी’ या चित्रपटाद्वारे अंकुश चौधरीसोबत रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. यानंतर तिने अनेक चित्रपट मुख्य आणि महत्वाच्या भूमिका साकारल्या. इतकेच नव्हे तर क्रांतीने अजय देवगणच्या ‘गंगाजल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती विशेषतः तिच्या ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यासाठी ओळखली जाते.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे हे २०१७ साली लग्नगाठीत अडकले. या जोडप्याला गोड जुळ्या मुली देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा